सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांच्या म्हणण्याचा उद्देश…, श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले
खोके लागत असतील तर तेही देऊ. ... असं वादग्रस्त व्यक्तव्य सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलं.
औरंगाबाद : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या खोक्यांच्या वक्तव्यावर खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांची जिभही घसरली. यावरून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झालेत. सत्तार यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. या अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, मी ते वाक्य ऐकलं नाही. सत्तारांचा म्हणण्याचा उद्देश तो नव्हता असं त्यांनी सांगितलं. मी खरचं ते ऐकलं नाही. आत्ताचं आलो.जस्ट लँड झालो. ते वाक्य मी तुमच्याकडून ऐकलं. मला वाटतं सत्तार साहेबांनी त्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. म्हणण्याचा उद्देश तो नव्हता, असं त्यांनी सांगितलं आहे. असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
खासदार श्रीकांत शिंदे हे सिल्लोड या अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. तत्पूर्वी सत्तार यांनी सुप्रिया सुळे व इतर काही लोकं हे खोक्यांवरून शिवसेनेवर नेहमी टीका करत असतात. त्यावर सत्तार म्हणाले, खोके लागत असतील तर तेही देऊ. … असं वादग्रस्त व्यक्तव्य सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलं. त्यामुळं राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होऊ लागली. यावर श्रीकांत शिंदे यांनी सावध पवित्रा घेतला.
श्रीकांत शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्याच मतदारसंघात सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, सभा कुठं होत आहे, यासाठी नक्की येऊन बघावं. शेतावर गावात राहण्याची सवय नसल्यानं असं होतं. याठिकाणी नेहमी मुख्यमंत्री येत असतात. याच ठिकाणी सभा होत आहे. हे स्टेडियम गावासाठी बनलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडं सत्ता होती, तेव्हा त्यांनी काही केलं नाही. आता सत्ता गेल्यामुळं विरोध करण्याशिवाय त्यांच्याकडं काही राहिलं नाही, अशी टीकाही श्रीकांत शिंदे यांनी केली.