Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायकः पोटच्या पोरीलाच प्रियकराच्या हवाली केलं, औरंगाबादेत आईसह आरोपींवर पोस्कोचा गुन्हा दाखल

पतीसोबत पटत नसल्याने वेगळे राहत असलेल्या महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला प्रियकराच्या हवाली गेले. अनेकदा अत्याचार झेलल्यानंतर अखेर मुलीने चाइल्ड लाइनशी संपर्क साधला असता गेल्या वर्षभरापासून घडत असलेला हा प्रकार उघडकीस आला.

धक्कादायकः पोटच्या पोरीलाच प्रियकराच्या हवाली केलं, औरंगाबादेत आईसह आरोपींवर पोस्कोचा गुन्हा दाखल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 11:31 AM

औरंगाबादः स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Suxual harrasment) करण्याची खुली सूट प्रियकराला देणाऱ्या आईला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमालाही अटक केली. शहरातील पुंडलिक नगर पोलीस (Aurangabad police) स्टेशनमध्ये मुलीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पतीशी पटत नसल्याने प्रियकरासोबत राहत होती आई

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम गाडे व त्याच्यासोबत अनैतिक संबंध असलेली महिला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेल्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीशी पटत नसल्याने सदर विवाहिता अल्पवयीन मुलगी व मुलासह गारखेडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. गेल्या सहा वर्षांपासून सोहम गाडे महिलेला भेटण्यासाठी घरी येत होता. रात्रीही मुक्काम करत होता. मुलीने तक्रारीत म्हटले की, ऑगस्ट 2020 मध्ये आईने भावाला मामाकडे पाठवले. त्यादिवशी सोहम गाडे घरी आला. आईचे व त्याचे काहीतरी बोलणे झाले. तो बळजबरी करू लागला तेव्हा आईनेही संमती दिली. त्यानंतर काही दिवसांनी दोन वेळा त्याने असेच कृत्य केले. अखेर आई व सोहम याच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडले. पण दुसरीकडे आसरा न मिळाल्याने पुन्हा घरी आली.

जीवे मारण्याची धमकी

अत्याचार झाल्याची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारू, अशी धमकी आई आणि सोहम गाडे याने दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. मात्र आईची मुलीला मामाच्या घरी पाठवून लग्न लावून देण्याची दिसताच, तिने चाइल्ड हेल्पलाइनला संपर्क केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पुंडलिक पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर बातम्या-

Nashik| मध्यरात्री 12 दरोडेखोरांचा हैदोस, घरमालक गंभीर; 6 लाखांचा ऐवज लंपास, एकाला पाठलाग करून बांधले

VIDEO | नोट एक के पिछे एक, तमाशा देख, पाईपमध्ये 13 लाखांच्या नोटा लपवल्या, लाचखोर इंजिनिअरचा जुगाड