उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?, शिवसेनेच्या खासदाराचा अशोक चव्हाणांना सवाल
आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण यांना केला आहे.
नांदेड: आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण यांना केला आहे.
हेमंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसले असते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल करत आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करु नये, अशी टीका पाटील यांनी केली.
आमचा वापर केला जातोय
महाविकास आघाडीमध्ये आमच शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे. आपला वापर होत असल्याच्या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून सगळ सहन करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
चव्हाण काय म्हणाले?
अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असं ते म्हणाले होते. आम्ही महत्वाचा पक्ष म्हणून आमचे समर्थन महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस आशावादी आहे, मुख्यमंत्र्यान्वर पूर्ण विश्वास आहे, तिन्ही पक्ष चांगले काम करत आहे, असे चव्हाण म्हणाले होते. कॉंग्रेसचेही समर्थन महत्वाचे आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना सत्तेत सामील पक्षांना काही संदेश द्यायचाय हे या वक्तव्यावरून दिसत असतानाच पाटील यांनी त्यावर पलटवार केला आहे.
थोरातांचे समर्थन
दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण यांच्या विधानाचं समर्थन केलं होतं. अशोक चव्हाण चुकीचं बोलले नाही. तीन घटक पक्ष आहेत. प्रत्येकाचं महत्त्व आहे. आमचंही महत्त्व आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमचं अस्तित्व तुम्ही पाहत आहात. आम्ही पंचायत समितीत नंबर वन आहोत. आमची संख्या कमी म्हणून आम्ही तिसऱ्या नंबरवर आहोत. आमचे मंत्री चांगलं काम करत आहेत, असं थोरात म्हणाले होते.
VIDEO : महत्त्वाच्या घडामोडी | 18 December 2021#FastNews #Newshttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/ka62YJvtyt
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 18, 2021
संबंधित बातम्या: