आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात, वणवा दिल्लीत पोहोचणार, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

औरंगाबादमधला मोर्चा ही तर सुरुवात असून या ठिणगीचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. या आक्रोशामुळे दिल्लीतील केंद्र सरकारचे तख्तही यामुळे हादरेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात, वणवा दिल्लीत पोहोचणार, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा
संजय राऊत यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत महागाईविरोधात मोर्चा
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:54 PM

औरंगाबादः महागाईविरोधात आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात शहरात भव्य मोर्चा निघाला आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीविरोधात सामान्य जनतेचा हा आक्रोश असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी मोर्चाप्रसंगीच्या भाषणात केले. शहरात आज शिवसेनेने क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला. गुलमंडीवर पोहोचल्यावर संजय राऊत यांनी या आंदोलनामागील शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

आक्रोशाची ठिणगी इथे, वणवा दिल्लीत पोहोचणार- राऊत

भाषणात बोलताना संजय राऊत म्हणाले, महागाईविरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात पडली आहे. या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली आहे. हा इतिहास पाहता आम्ही मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरातून आम्ही या आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. ही तर सुरुवात असून या ठिणगीचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. या आक्रोशामुळे दिल्लीतील केंद्र सरकारचे तख्तही यामुळे हादरेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

मोदींनी 18 कोटी रुपयांचे विमान खरेदी केले

महागाईवर आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, गेल्या दोन वर्षात सुमारे 17 हजार लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आर्थिक संकट आणि महागाईच्या कारणामुळे आत्महत्या केली. मात्र केंद्र सरकारला याची चिंता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी तब्बल 18 कोटी रुपयांचे विमान खरेदी केले.. त्यामुळे अशा सरकारचं करायचं काय असा प्रश्न पडला आहे, असेही ते म्हणाले. काही वर्षांपूर्वी 75 पैशांना असलेला साधा माचिस बॉक्सही 2 रुपयांना झाल्याचं त्यांनी यावेळी लक्षात आणून दिलं.

सत्तेत असून शिवसेनेची कोंडी,भाजपची रोज कारस्थानं..

राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसनेचे असूनही आंदोलन का करताय, असा प्रश्न विचारला जातोय, त्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. राज्यात सत्तेत असूनही सरकारला काम करू द्यायचे नाही, अशी कारस्थानं चालवली जात आहेत. रोज महाविकास आघाडीच्या दारात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची यंत्रणा आणून उभी करायची, सरकारची नाकेबंदी करायची, अशी कारस्थानं केवळ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हलवण्यासाठी सुरु आहेत. याद्वारे मुख्य प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचं काम सुरु आहे, म्हणून आम्ही आंदोलन करतोय, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.

इतर बातम्या-

अमरावतीत 144 कलम लागू, जमावानं टपरी जाळली, पोलिसांकडून अश्रूधूराचा वापर

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सातारा जिल्ह्यात भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.