औरंगाबादेत लसीकरणाला नागरिकांचा संथ प्रतिसाद, महापालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार

आजवर शहरात पाच लाख 81 हजार 357 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिलाच डोस पूर्ण केला. 3 लाख 39 हजार 660 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आगामी काळात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सव्वा लाख लोकांसाठी अडीच लाख लसींची आवश्यकता आहे.

औरंगाबादेत लसीकरणाला नागरिकांचा संथ प्रतिसाद, महापालिका घरोघरी जाऊन जनजागृती करणार
औरंगाबादेत विविध ठिकाणी केंद्र सुरु करूनही नागरिकांचा लसीकरणाला संथ प्रतिसाद
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 10:53 AM

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर औरंगाबादकरांनी लसीकरणाकडेही (vaccination in Aurangabad) दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. शहरातील असंख्य नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असला तरीही दुसऱ्या डोसचे गांभीर्य अनेकांना नाही, असेच चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसींचा तुटवडा झाला होता, मात्र लस मिळण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. आता मात्र महापालिकेकडे (Aurangabad Municipal corporation) लसींचा साठा पडून असला तरीही नागरिक लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून आता घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. सणासुदीचा काळ सुरु असल्याने महापालिकेने आता शहरातील मॉल्समध्येही (Vaccine in Malls) लसीकरण केंद्र उभारली आहेत. तसेच हायकोर्टातही लस मिळण्याची सुविधा दिली आहे.

 सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण बाकी

16 जानेवारीपासून औरंगाबाद शहरात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. दुसरी लाट सुरू असताना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र त्या वेळी लसींचा तुटवडा होता. त्यामुळे मनपाच्या जम्बो लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागला. दुसरी लाट ओसरताच कोरोना लस घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली. आता लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात मिशन कवच कुंंडल मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मनपाने शहरात 21 खासगी रुग्णालयांच्या ठिकाणी मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मागील आठवडाभरापासून लसीकरणाला काहीशी गती प्राप्त झाली आहे. सोबतच आरोग्य विभागाने हायकोर्टासह शहरातील प्रमुख चार मॉलच्या ठिकाणीदेखील 20 ऑक्टोबरपासून लसीकरण केंद्र सुरू केले आहे. सद्य:स्थितीत मनपाने निश्‍चित केलेल्या 10 लाख 55 हजार 600 नागरिकांच्या लसीकरणापैकी 19 ऑक्टोबरपर्यंत 9 लाख 21 हजार 17 जणांनी लस घेतली आहे.

कोणत्या भागात कमी लसीकरण?

शहाबाजार, जुना बाजार, जिन्सी, नेहरूनगर, सादातनगर, गणेश कॉलनी, कैसर कॉलनी, गरमपाणी, सिल्कमिल कॉलनी, भावसिंगपुरा या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सिडको एन-8, सिडको एन-11, बन्सीलालनगर, राजनगर, जवाहर कॉलनी, क्रांती चौक, अंबिकानगर, मसनतपूर, नक्षत्रवाडी, पुंडलिकनगर या भागातील केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण झाल्याची माहिती मनपातून देण्यात आली.

दोन डोस पूर्ण झालेल्यांची संख्या किती?

आजवर शहरात पाच लाख 81 हजार 357 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिलाच डोस पूर्ण केला. 3 लाख 39 हजार 660 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आगामी काळात उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सव्वा लाख लोकांसाठी अडीच लाख लसींची आवश्यकता आहे. सोबतच दुसरा डोस बाकी असलेल्यांसाठी सुमारे पाच लाख लसी लागतील. त्यामुळे एकूण 8 लाखांच्या आसपास लसींची गरज आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

इतर बातम्या-

जे मलेशिया, सिंगापुरात ते थेट औरंगाबादला, जळगावला जाणाऱ्या वाहनांसाठी 2 कि.मी. भुयारी मार्ग

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.