“…तर उद्धव ठाकरे यांनी १ इंचही आमदारांना हलू दिलं नसतं;” अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
नारायण राणे यांना संजय राऊत साहेबांनी योग्य रीतीने उत्तर दिलं आहे. कोणी काहीही बोलतं. सध्या त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही.
औरंगाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, शिक्षक समाजाचा आरसा आहेत. आरशाने भाजपचा पराभव केला आहे. जनता भाजपवर नाराज आहे. कंटाळलेली जनता भाजपचा (BJP) पराभव करेल, असा विश्वास अंबादान दानवे यांनी व्यक्त केला. भाजप नागपूरमध्ये पराभूत झाली. नागपूरची जनता ही भाजपला नाकारत आहे. जुनी पेंशन योजना इतर छोट्या राज्यात सुरू आहे. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. या राज्याला सुद्धा जुनी पेंशन योजना लागू केली पाहिजे, असं मतही अंबादास दानवे यांनी.
आग्राहून सुटका ही महत्त्वाची घटना आहे. तिथ त्यांना अटक केली होती. औरंजेबाच्या पाशातून शिवाजी महाराज सुटणं, हे शिवाजी महाराज यांचं पराक्रम होतं. महाराष्ट्राच्या दृष्टीनं नव्हे तर हिंदूंच्या दृष्टीने हे स्थळ महत्त्वाचं आहे. याठिकाणी शिवजयंती साजरी झाली पाहिजे. तिथं नाचायला गायला परवानगी मिळते. मग शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी का नाही, असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला.
पुरातत्व विभागाचे हे धोरण विसंगत आहे. शिवजयंतीला आग्र्याला लाल महालात परवानगी न देणे ही चुकीची घटना आहे. शिवजयंतीला परवानगी दिली पाहिजे, असं मतही अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.
कोणी काहीही बोलते
संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. नारायण राणे यांना संजय राऊत साहेबांनी योग्य रीतीने उत्तर दिलं आहे. कोणी काहीही बोलतं. सध्या त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही.
बळजबरीने ठेवण्यात अर्थ नाही
अजित पवार म्हणाले, आमदार फुटणार आहेत, याची कल्पना शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती. पण, त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. यावर बोलताना अंबादास दानवे यांनी सांगितलं की, आमदार फुटणे ही बाब उद्धव ठाकरे यांना आधीच माहीत होतं. पण, जे मनान माझे राहिले नाही, त्यांना बळजबरीने ठेवण्यात अर्थ नाही, असं ठाकरे यांचे म्हणणे होते.
जे गेले त्यांना जाऊ दिले
ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांना अधिकारी होते. त्यांनी मनात आणलं असतं तर एक इंचही हलू दिलं नसतं. त्यांनी मनात आणलं असतं तर एका -एका आमदाराला उचलून आणलं असतं. पण त्यांनी ते केलं नाही. जे गेले त्यांना जाऊ दिलं. जे निष्ठेने राहिले त्याचं त्यांनी स्वागत केलं.