SSC | दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा एलिमेंटरीशिवाय देता येणार इंटरमिजिएट परीक्षा, परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता
रेखाकला इंटरमिजिएट परीक्षा आता ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी घेण्यात येणारे वाढीव शुल्कही परत करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. महाराष्ट्रात ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 11 हजार विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औरंगाबादः कला संचलनालयातर्फे शासकीय रेखाकला अर्थात इंटरमिजिएट परीक्षा (Intermediate Exam) यंदा दहावीच्या (SSC Exam) मुख्य परीक्षेनंतर ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. विशेषतः त्याआधीच्या एलिमेंटरी परीक्षेशिवाय या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसता येणार आहे. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना दहावीला सवलतीचे गुण मिळतात. तसेच कला महाविद्यालयातील (Junior Collage of Arts) प्रवेशासाठी ही परीक्षा उपयुक्त ठरत असते. यंदा ही परीक्षा दहावीची मुख्य लेखी परीक्षा संपल्यानंतर म्हणजे एप्रिलच्या शेवटी ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. कला संचालनालयाने यावर्षीसाठी परीक्षा नियमावलीत बदल केला आहे. त्यात एलिमेंटरी परीक्षा नसेल दिली तरीही विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षा देता येणार आहे. त्याचे वाढीव गुण बोर्डासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या निर्णयमामुळे यंदा इंटरमिजिएट परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ऑनलाइनऐवजी ऑफलाइन परीक्षा होणार
कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला इंटरमिजिएट ऑनलाइन परीक्षा होणार होती. परीक्षेबाबतची नियमावली, दुप्पट शुल्कामुळे विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच कलाशिक्षक, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ आणि शिक्षक भरतीकडून विरोध करण्यात आला होता. इंटरमिजिएट परीक्षा ही ऑनलाइन घेणे शक्य नाही. ही परीक्षा ऑफलाइन घेण्यात यावी, अशी पालकांची मागणी होती. त्यानंतर शासनाने ही परीक्षा ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
परीक्षेचे वाढीव शुल्क परत मिळणार
रेखाकला इंटरमिजिएट परीक्षा आता ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी घेण्यात येणारे वाढीव शुल्कही परत करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. महाराष्ट्रात ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 11 हजार विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी भरलेल्या 220 रुपये शुल्कापैकी किती आणि कसे शुल्क मिळणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. भरलेल्या शुल्कातून जीएसटी व काही शुल्क वगळून उर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांना परत केली जाईल. ही रक्कम विद्यार्थ्यांनी ज्या बँक खात्यातून शुल्क भरले आहे, त्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वळती करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महा मंडळाच्या उपनगर जिल्ल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी सांगितले.
इतर बातम्या-