आणखी एका एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक
बीड जिल्ह्यातील कड्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कड्यामध्ये एसटी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. बाळू महादेव कदम वय 35 वर्ष, रा. आष्टी असे या चालकाचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड – जिल्ह्यातील कड्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कड्यामध्ये एसटी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. बाळू महादेव कदम वय 35 वर्ष, रा. आष्टी असे या चालकाचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कदम हे आज बस क्रमांक एम-एच 20 बीएल 2086 जामखेड-पुणे गाडी घेऊन कडा बसस्थानकात आले होते. यावेळी त्यांनी बसस्थानक परिसरामध्ये बस पार्क करून, विष प्राशन केले. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी संबंधित चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन मिळते, या वेतनातच त्यांंना घराचा गाडा चालवावा लागतो. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना वेतन देखील वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पगार न मिळाल्यास घर कसे चालवायचे? या विवंचनेतून आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अंसतोष असून, ते आता रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन महामंडळाला बसत आहे . जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमीक एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. एसटीच्या संपामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाला सुरू आहेत. बस सेवा विस्कळीत झाल्याने खासगी वाहनांनी आपले दर वाढवले आहेत.
Video : Prasad Lad | संजय राऊत आणि मलिकांनी रोज लवंगी लावतात आम्ही बॉम्ब फोडणार – प्रसाद लाड https://t.co/a6oCl17QnB @PrasadLadInd @BJP4Maharashtra @rautsanjay61 @ShivSena #PrasadLad #SanjayRaut #Shivsena #BJP #PetrolDieselPrice
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2021
सबंधित बातम्या
क्रूझ ड्रग प्रकरणाला नवे वळण; शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती
एसटी कामगारांना नोकरीवरून काढू नका, नाही तर…; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कोर्टाचा मज्जाव, कामगार नेत्याला प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचे आदेश