औरंगाबादेत तलाठ्याची आत्महत्या! चिठ्ठीत लिहिली अधिकाऱ्यांची नावं आणि बेकायदा कामांविषयी..
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली. शहरातील सातारा परिसरात ही घटना घडली.
औरंगाबादः वरिष्ठांकडून वारंवार येणारा दबाव आणि कामाच्या ताणामुळे औरंगाबादमधील तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांनी आत्महत्या (Suicide case) केल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून नोकरीचा राजीनामाही दिला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता. त्याचाही ताण लक्ष्मण यांच्यावर होता. अखेर पत्नी माहेरी गेल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
रविवारी सकाळी मृतदेह आढळला
सातारा गावात पत्नी व मुलासह लक्ष्मण यांचे कुटुंब राहत होते. पत्नी चार महिन्यांची गर्भवती आहे. तीन वर्षाच्या मुलासोबत ती हिमायतबाग येथे माहेरी गेली होती. शनिवारी रात्री लक्ष्मण कामावरून घरी आले. पण रविवारी सकाळी ते उठलेच नाही. 70 वर्षीय आई लक्ष्मण यांना उठवण्यासाठी गेल्या तेव्हा आतून काही आवाज आला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा मुलगा थेट लटकलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी आरडा-ओरड सुरु करताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. सातारा पोलिसाना या घटनेची माहिती देण्यात आली.
चिठ्ठीत 12 ते 13 अधिकाऱ्यांची नावं
लक्ष्ण यांच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय, हे जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्याय करणाऱ्या वरिष्ठांबाबत चिठ्ठीत लिहिले आहे. त्यात महसूल विभाग, तलाठी कार्यालयातील एकूण 13 वरिष्ठ अधिकारी व सहकारी तसेच तलाठी संघटनेचे नाव असल्याचा संशय आहे. सोमवारी याबाबत पुढील कारवाई करू, असे पोलिसांनी आश्वासन दिले.
दोनदा राजीनामा, नंतर बदली
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभागात कार्यरत असलेले लक्ष्मण यांना संजय गांधी निराधार योजना विभागात खूप त्रास दिला जात होता. तेथील बेकायदा कामे त्यांना पटत नव्हती. त्याच त्रासाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र तो न स्वीकारता त्यांची बदली करण्यात आली. वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांनी पत्नीला दिली होती.
इतर बातम्या-