औरंगाबादः वरिष्ठांकडून छळ होत असल्याचे चिठ्ठीत लिहून तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे (Lakshman Borate) यांनी रविवारी आत्महत्या केली. लक्ष्मण यांनी लिहिलेल्या सहा पानी चिठ्ठी (Suicide note) लिहून ठेवली होती. त्यात त्यांना त्रास देणाऱ्या 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यावरून संबंधित वरिष्ठांवर कारवाई करण्याची मागणी लक्ष्मण यांच्या कुटुंबियांनी केली आहे. विशेष म्हणजे लक्ष्मण बोराटे यांनी लिहिलेली चिठ्ठीदेखील कुटुंबियांना दाखवण्यात आलेली नाही. तसेच सोमवारपर्यंत या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला नव्हता.
लक्ष्मण बोराटे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून संशयितांची चौकशी करण्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले आहे. मात्र बोराटे यांच्या सुसाइड नोटमध्ये उपजिल्हाधिकारी पदाचा एक अधिकारी, तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह 13 जणांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बोराटे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक विभागात कार्यरत होते. पूर्वी ते संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत होते. तेव्हा गैरप्रकार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले जात असल्याची तक्रार त्यांनी पत्नीकडे केली होती. यापूर्वी दोन वेळेस त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र तो स्वीकारण्यात आला नव्हता. त्यानंतरही ते कायम तणावात असल्याची माहिती पत्नीने दिली. तलाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी मात्र बोराटे यांच्या आत्महत्या ही महूसल आणि तलाठी संघटनेसाठी खूपच धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. मागील तीन महिन्यात बोराटे 25 दिवस ड्यूटीवर होते, तरीही त्याला कोणतीही नोटीस दिली नव्हती, तसेच पगारही कपात झाला नव्हता.
इतर बातम्या-