विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर उपासमारीची वेळ, तात्काळ आर्थिक मदत द्या; प्रविण दरेकरांची मागणी

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे अनेक संस्थाचालकांनी शिक्षकांना पगार दिला नाही, त्यामुळे शिक्षकांना कुटुंब चालवणे अवघड झाले आहे.

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांवर उपासमारीची वेळ, तात्काळ आर्थिक मदत द्या; प्रविण दरेकरांची  मागणी
pravin darekar
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 10:42 PM

औरंगाबाद : विनाअनुदानित शिक्षकांवर सध्या कोरोनोमुळे उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकार या शिक्षकांच्या अवस्थेकडे गंभीरपणे पाहत नाही. त्यामुळे या प्रश्नावर आपण आवाज उठवणार असून विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे करणार असल्याची भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज स्पष्ट केली. (Teachers in unsubsidized schools should get immediate financial assistance in times of financial crisis : Pravin Darekar)

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे अनेक संस्थाचालकांनी शिक्षकांना पगार दिला नाही, त्यामुळे शिक्षकांना कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. अशाच औरंगाबादच्या खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांवर चक्क चिकटटेप विकण्याची वेळ तर दुसऱ्या शिक्षकावर शेती करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांच्या या दुरावस्थेची माहिती मिळाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील रांजणगाव येथे जाऊन शिक्षकांची भेट घेतली. त्या शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या.

शिक्षकांच्या व्यथा एकून विरोधी पक्षनेते दरेकर अस्वस्थ झाले. त्यांना गहिवरुन आले. यावेळी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी या शिक्षकांना प्राथमिक स्वरूपात प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली. यावेळी आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लाखोंच्या संख्येने शिक्षक महाराष्ट्रात आहेत, त्यांची चूल पेटू शकत नाही. त्यांचा संसार चालू शकत नाही. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता असून राज्य सरकारकडे याप्रश्नी वेदना मांडल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी शिक्षकांच्या प्रश्नांसदर्भात फोनवरुन संर्पक साधला व त्यांच्याशी चर्चा केली व या शिक्षकांसह राज्यातील लाखो शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

प्रचंड मेहेनत करून, कष्ट घेऊन शिक्षक झालेल्या हजारो तरुणांना देशाची भावी पिढी घडवण्याऐवजी देशोधडीला लागावे लागत आहे. महाविकास आघाडी सरकारचे शिक्षकांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शिक्षकांना पगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारला जाब विचारण्यात येईल असा इशाराही प्रविण देरकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिला.

प्रथम डी. एड त्यानंतर बीएड करून शिक्षक बनून चांगली नोकरी लागेल असे स्वप्न पाहणारे औरंगाबादच्या बिडकीन गावातील दिनेश गोखले 2012 पासून तुटपुंज्या पगारावर विनाअनुदानित शाळेत नोकरी करत आहेत. पण कोरोनामुळे शाळा बंद असल्याने उपजिविका भागवण्यासाठी दिनेश यांनी शिक्षकी पेशा बाजूला ठेऊन दिवसभर दुकानांवर जाऊन चिकटटेप विकण्याची वेळ आली आहे. तर, गोखले यांच्याप्रमाणेच रांजणगाव येथील मनोहर इनामे या शिक्षकावर शाळा बंद आणि पगारही बंद असल्याने अनेक गावाकडे जाऊन शेती करण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती राज्यभरातील विना अनुदानित शाळेतील शिक्षकांची आहे असेही दरेकर यांनी सांगितले.

इतर बातम्या

Video | औरंगाबादेत वेरुळजवळ रस्ता खचला, तब्बल 10 फुटांपेक्षाही पडला मोठा खड्डा, पूल कोसळण्याची भीती

पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील वैद्यनाथ कारखान्याला उतरती कळा, आधी नोटीस आता थेट पीएफ खातं बंदची कारवाई

नाना पटोले यांच्या पाठोपाठ अमित देशमुखांचेही स्वबळाचे संकेत, औरंगाबाद महापालिकेबाबत विचार सुरु असल्याचाही दावा

(Teachers in unsubsidized schools should get immediate financial assistance in times of financial crisis : Pravin Darekar)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.