TET Exam: परीक्षा घोटाळ्यातील सुखदेव डेरेंची औरंगाबादेतील कारकीर्दही कलंकीतच! नियमबाह्य पदमान्यतांचा ठपका

टीईटी घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले आरोपी सुखदेव डेरे हे औरंगाबादेत असताना येथील कारकीर्दीतही त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते.

TET Exam: परीक्षा घोटाळ्यातील सुखदेव डेरेंची औरंगाबादेतील कारकीर्दही कलंकीतच! नियमबाह्य पदमान्यतांचा ठपका
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी आरोपी सुखदेव डेरे
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 10:56 AM

औरंगाबादः शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेच्या (TET Exam) 2018 मधील निकालात गैरव्यवहाराचा आरोप असलेले राज्य परीक्षा परिषदेचे निवृत्त आयुक्त सुखदेव डेरे (Sukhdev Dere) यांना काल पुण्यात अटक करण्यात आली. सुखदेव डेरे हे औरंगाबादमध्ये नियुक्त असतानाही त्यांची कारकीर्द वादग्रस्त आणि अनेक आरोपांनी बरबटलेलीच होती, अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबादेत शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत असताना अनेक शिक्षक संघटनांनी त्यांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणला होता. तसेच नियमबाह्य शिक्षकांच्या पदमान्यता दिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील झाली होती.

दोन वर्षे औरंगाबादेतला कार्यकाळ

सुखदेव डेरे यांनी औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक म्हणून दोन वर्षे काम केले. त्यांच्याकडे विभागीय शिक्षण मंडळात अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभारदेखील होता. 4 डिसेंबर 2012 ते 16 जानेवारी 2014 अशी दोन वर्षे ते औरंगाबादेत होते. शिक्षण उपसंचालक पदावर असताना संस्थाचालकांच्या दबावात नियमबाह्यमपणे अनेक शिक्षकांच्या पदाला मान्यता दिल्याचा आरोप डेरेंवर झालेला होता. तसेच अनेक शिक्षक संघटनांनी अनेक आंदोलने करून डेरेंनी केलेली नियमबाह्य नियुक्त्यांची प्रकरणे उघड केली होती.

शिक्षक संघटना समन्वय समितीमार्फत त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथील शिक्षण संचालक आणि मंडळाचे मुख्यलय असेलले राज्य परीक्षा मंडळाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, डेरे यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी झाली. त्यात त्यांनी निर्दोष असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत पदोन्नती देऊन रुजू करून घेतले होते. आता शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून ते सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

इतर बातम्या-

Sanjay Raut : उत्तर प्रदेशनंतर केंद्रातही सत्ता परिवर्तन, नरेंद्र मोदी यूपीत आठ आठ दिवस मुक्काम टाकून बसलेत, संजय राऊत यांच्याकडून पश्चिम बंगालचा दाखला

वाळू चोरी करताना ट्रॉली उलटली, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.