औरंगाबादः 25 जवानांचे 5 तास शर्थीचे प्रयत्न, करमाडच्या तलावातली कार अखेर बाहेर, तिघांचा मृत्यू
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड परिसरातील (Karmad, Aurangabad) कोल्हापुरी बंधाऱ्यात भरधाव वेगाने आलेली कार पडली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना (Car Accident) घडली. तेव्हापासून अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि पोलीस ही कार आणि त्यातील प्रवाशांचा शोध घेत होते. तलाव खूप खोल असल्याने कर्मचाऱ्यांना बचावकार्य करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पाच तासांच्या परिश्रमानंतर कार आणि त्यातील […]
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड परिसरातील (Karmad, Aurangabad) कोल्हापुरी बंधाऱ्यात भरधाव वेगाने आलेली कार पडली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना (Car Accident) घडली. तेव्हापासून अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि पोलीस ही कार आणि त्यातील प्रवाशांचा शोध घेत होते. तलाव खूप खोल असल्याने कर्मचाऱ्यांना बचावकार्य करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पाच तासांच्या परिश्रमानंतर कार आणि त्यातील प्रवासी कर्मचाऱ्यांच्या हाती लागले. मात्र यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.
दोन महिला व एका पुरुषाचा मृत्यू
करमाडच्या जवळच असलेल्या जडगाव येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तब्बल पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर हे चारचाकी वाहन बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. या अपघातात दोन महिला आणि एक पुरुष असा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव असलेलं हे चारचाकी वाहन नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याशेजारी असलेल्या तलावात कोसळले होते, तलावातील पाणी खोल असल्यामुळे गाडीतील तिन्ही प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला, पाणी खोल असल्यामुळे गाडी बाहेर काढण्यासाठी तब्बल 5 तासांचा वेळ लागला.
शहरातील गजानन नगरातील प्रवासी
औरंगाबाद तालुक्यातील शेलुद येथील असून सध्या ते शहरातील गजानन नगर येथेच रहात होते. कारमधील व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत.. वैजीनाथ उमाजी चौधरी – 52 मंगल वैजीनाथ चौधरी – 45 सुकन्या मधुर चौधरी – 22
सासू-सासरे, सुनेचा मृत्यू
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वैजिनाथ चौधरी हे कारने आपली पत्नी व सुनेला घेऊन दर्शनासाठी एकलहरा देवीच्या दर्शनासाठी जात होते. जडगाव येथील नातेवाईक राजेंद्र वाघ यांना भेटून पुढे एकलहरा येथे जाण्याचा बेत ठरवला. लाडगावहून जात असताना जडगावच्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ चौधरी यांचा कारवरील ताबा सुटून कार बंधाऱ्यात पडली. त्यांनी मोबाइलद्वारे नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद पडला. या बंधाऱ्यात जवळपास 30-40 फूट पाणी खोल असल्याने कारचा शोध घेण्यास अडचण येत होती. या वेळी अग्निशमन दलाचे 25 जवान व गावकऱ्यांनी पाच तास अथक प्रयत्न करून सायंकाळी पावणेसात वाजता क्रेनच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढली.
इतर बातम्या-
तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत