ऑफिसात या.. पण पाहुणचार चहाचा नव्हे, गूळ-पाण्याचा मिळणार, लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

औरंगाबादः कोरोनाने अनेक पातळ्यांवर आरोग्यविषयीची जागरूकता निर्माण केली आहे. अगदी घरातील लहान मुलांपासून देशपातळीवरील यंत्रणा आरोग्याबाबत सजग झाली आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे निर्णय अनेक स्तरांवर घेतले जात आहेत. असाच एक स्तुत्य उपक्रम लातूर जिल्हा माहिती कार्यालयानेही  (Latur District information office)हाती घेतला आहे. या कार्यालयात येणाऱ्या प्रसार माध्यमातील लोकांना, नेत्यांना आता चहाऐवजी गुळ पाणी […]

ऑफिसात या.. पण पाहुणचार चहाचा नव्हे, गूळ-पाण्याचा मिळणार, लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
लातूर जिल्हा माहिती कार्यालयात आता चहाऐवजी गूळ पाणी मिळणार
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 6:11 PM

औरंगाबादः कोरोनाने अनेक पातळ्यांवर आरोग्यविषयीची जागरूकता निर्माण केली आहे. अगदी घरातील लहान मुलांपासून देशपातळीवरील यंत्रणा आरोग्याबाबत सजग झाली आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे निर्णय अनेक स्तरांवर घेतले जात आहेत. असाच एक स्तुत्य उपक्रम लातूर जिल्हा माहिती कार्यालयानेही  (Latur District information office)हाती घेतला आहे. या कार्यालयात येणाऱ्या प्रसार माध्यमातील लोकांना, नेत्यांना आता चहाऐवजी गुळ पाणी मिळणार आहे.

नको चहा.. आता गुळ पाणी प्या

बदलत्या जीवन शैलीत आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले. जंक फूडच्या जमान्यात शरीरात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक जात असल्यामुळे पित्तदोष वाढत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात वारंवार होणारा विकार होऊन बसला आहे. यात चहाचे वाढते सेवन हे या विकाराला बळ देत आहे. हे लक्षात घेऊन बुधवारपासून लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयात ” नको चहा.. आता गुळ पाणी प्या ” असा पाहुणचार होणार आहे, अशी माहिती येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी दिली.

कार्यालयात आता सेंद्रिय गूळ व तांब्याच्या भांड्यातले वाळ्याचे पाणी

जिल्हा माहिती कार्यालय हे प्रसार माध्यमातील लोकांचा राबता असलेलं शासकीय कार्यालय असतं. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना आता आरोग्यदायी पाहुणचार मिळणार आहे. वारंवार शरीरात कॅफीन घालून पित्तदोष ( एका कपात 10 मिली ग्रॅम एवढे कॅफीन असते) वाढविण्यापेक्षा आता शरीराला पोषक असलेला सेंद्रिय गुळ, तांब्याच्या भांड्यातले वाळे घातलेले पिण्याचे पाणी हा जुन्या काळातला नवा पाहुणचार या कार्यालयात सुरु करत आहोत, अशी माहिती पाटील यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणतात, जुन्या काळात पिण्याचे पाणी फक्त तांब्याच्या भांड्यातून पीत असत म्हणून पाणी पिण्याच्या भांड्याचे नावच तांब्या पडले. गुळ पाणी तर आता आता पर्यंत पाहूणचाराची पद्धत आपल्याकडे होती. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे गूळ, तांब्याच्या भांड्यातले पाणी आणि वाळा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असलेले पाणी आम्ही सुरु केले आहे.

इतर बातम्या-

T20 World Cup: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघावर संकट, दिग्गज खेळाडू बाहेर होण्याची दाट शक्यता

औरंगाबाद विमानतळावरही खासगीकरणाचे वारे, सोयी- सुविधा, प्रवासी संख्येची सविस्तर माहिती मागवली

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.