Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Crime: झाडाला लटकलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले, पत्नीचे तरुणासोबतचे एडिट केलेले फोटो पाहून आले होते नैराश्य

संतोष बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नीने इरफान पठाण याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, संतोष वडगावकडे येत असताना इरफान पठाणने त्याला एकतानगर- हर्सूल येथे अडवले. संतोषच्या पत्नीसोबत काढलेले फोटो एडिट करून संतोषला दाखवले होते.

Aurangabad Crime: झाडाला लटकलेल्या 'त्या' मृतदेहाचे रहस्य उलगडले, पत्नीचे तरुणासोबतचे एडिट केलेले फोटो पाहून आले होते नैराश्य
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 1:34 PM

औरंगाबाद: वाळूज महानगरातील वडगाव येथील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह तिसगाव खदानीतील (Worker Found dead in Tisgaon Query)   झाडाला लटकत्या अवस्थेत आढळून आल्याने काल औरंगाबादमध्ये एकच खळबळ माजली होती. झाडाचा हा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे संतोष  वाघमारे (Santosh Waghmare) या कामगाराने आत्महत्या केली की हा घातपात होता, हे गूढ उलगडलेले नव्हते. शुक्रवारी संतोषच्या मृत्यूमागील कारण उलगडण्यात पोलिसांना यश आहे. पत्नीचे अन्य तरुणासोबतचे फोटो पाहिल्याने संतोषला प्रचंड नैराश्य आले होते आणि याच मनःस्थितीत त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 डोंगरालगतच्या खदानीत आढळला मृतदेह

32 वर्षीय संतोष हा वाळूज एमआयडीसीतील लुमॅक्स कंपनीत काम करत होता. 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मी कंपनीत कामाला जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र संध्याकाळपर्यंत तो घरी परतलाच नाही. अखेर खूप शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वाळूज पोलीस स्टेशनकडून तपास सुरु होता. अखेर 16 सप्टेंबर रोजी संतोषचा मृतदेह तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरालगतच्या खदानीत झाडाला टांगलेल्या स्थितीत नागरिकांना दिसून आला. नागरिकांच्या सूचननेनुसार पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. संतोषच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मात्र हा मृत्यू नेमका का झाला, याचा तपास सुरु होता.

इरफानने दाखवले होते पत्नीसोबतचे एडिटेड फोटो

संतोष बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नीने इरफान पठाण याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, संतोष वडगावकडे येत असताना इरफान पठाणने त्याला एकतानगर- हर्सूल येथे अडवले. संतोषच्या पत्नीसोबत काढलेले फोटो एडिट करून संतोषला दाखवले होते. घरी परतल्यावर संतोषने पत्नीला याविषयी विचारणा केली. तेव्हा इरफानची ओळख असल्याने त्याने फोटो काढून ते एडिट करून तुम्हाला दाखवले, असे पत्नीने सांगितले. एवढेच नाही तर इरफानने केलेली शरीरसुखाची मागणी धुडकावून लावल्यानंतर त्याने तुला बरबाद करण्याचीही धमकी दिली, असेही पत्नीने संतोषला सांगितले होते. पत्नीसोबत इरफानचे एकत्रित फोटो पाहिल्यानंतर संतोषने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी मयत संतोष वाघमारेच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी इरफान पठाणविरुद्ध एमआयडीसी वाळू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे करीत आहेत.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

Aurangabad Crime: धारदार शस्त्रानं हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला घातली अंघोळ, घटनास्थळही धुऊन काढलं, ढोरकीन गाव पहाटेच हादरलं

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.