राज्यातील महिला सरपंचाना आदर्श पुरस्कार देणार, औरंगाबादेत ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
औरंगाबादः राज्यातील महिला सरपंचांसाठी शासनाने आदर्श (Adarsh Mahila Sarpanch Award) रस्कार देण्याची घोषणा केली आहे. औरंगाबादमधील एक परिषदेत ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यासंबंधीची घोषणा केली. जिल्हा परिषदेच्या वतीने आज औरंगाबादमध्ये महिला सरपंच परिषदेचे (Mahila Sarpanch Parishad) आयोजन करण्यात आले. शहरातील तापडिया नाट्यमंदिरात ही परिषद पार पडली. यावेळी ग्रामविकास व महसूल […]
औरंगाबादः राज्यातील महिला सरपंचांसाठी शासनाने आदर्श (Adarsh Mahila Sarpanch Award) रस्कार देण्याची घोषणा केली आहे. औरंगाबादमधील एक परिषदेत ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यासंबंधीची घोषणा केली. जिल्हा परिषदेच्या वतीने आज औरंगाबादमध्ये महिला सरपंच परिषदेचे (Mahila Sarpanch Parishad) आयोजन करण्यात आले. शहरातील तापडिया नाट्यमंदिरात ही परिषद पार पडली. यावेळी ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते.
कसे असेल आदर्श सरपंच पुरस्काराचे स्वरुप?
ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य आणि जिल्हा पातळीवर आदर्श महिला सरपंच पुरस्काराचे वितरण केले जाईल. या पुरस्काराचे नाव स्व. मीनाताई ठाकरे आदर्श महिला सरपंच पुरस्कार असे असेल. पहिला पुरस्कार 25 लाख रुपये रोख रकमेचा असेल. तसेच आणखी पाच जणांना आदर्श सरपंचाचा पुरस्कार देण्यात येईल. येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती सत्तार यांनी दिली.
पुरस्कार पुढील प्रमाणे-
1- पहिला पुरस्कार 25 लाख रुपये रोख रक्कमेचा आदर्श सरपंच पुरस्कार 2- दुसरा पुरस्कार 20 लाख रुपये रोख रक्कम 3- तिसरा पुरस्कार 10 लाख रुपये रोख रक्कम 4- चौथा पुरस्कार 05 लाख रुपये रोख रक्कम 5- पाचवा पुरस्कार 05 लाख रुपये रोख रक्कम
महिला सरपंच परिषदेत आणखी काय?
औरंगाबाद इथं आज होऊ घातलेल्या महिला सरपंच परिषदेत ‘ग्रामविकासमध्ये सरपंचाची भूमिका’ या विषयावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष (कोल्हापूर), भारत अप्पा पाटील, ‘आमचे गाव आमचा विकास’ या विषयावर उपसंचालक बी.एम. वराळे, जलजीवन मिशन एक मिशन या विषयावर महाराष्ट्र जीवन प्राधिककरणाचे संचालक अजय सिंह मार्गदर्शन करतील. ‘नानाजी देशमुख संजीवनी योजना’ या विषयावर जिल्हा कृषी अधिकारी पी.आर. देशमुख मार्गदर्शन करतील.
इतर बातम्या-