हमारे साथ गलत काम किया.. पीडितेने फोडला हंबरडा, तोंडोळी बलात्कार प्रकरण, मंत्री संदीपान भूमरेंकडून सांत्वन

शिवसेना नेते संदीपान भूमरे यांनी तोंडोळीतील घटना स्थळाला भेट दिली. या कुटुंबियांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच तोंडोळी आणि परिसरातील काही वस्तींवर दरोडेखोरांनी केलेल्या लूटमारीचा जलद गतीने तपास करावा, अशा सूचनादेखील संदीपान भूमरे यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

हमारे साथ गलत काम किया.. पीडितेने फोडला हंबरडा, तोंडोळी बलात्कार प्रकरण, मंत्री संदीपान भूमरेंकडून सांत्वन
तोंडोळी दरोडा प्रकरणी घटनास्थळाला संदीपान भूमरे यांची भेट
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 2:21 PM

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील शेतवस्तीवर पडलेल्या दरोड्यामुळे सध्या औरंगाबादच्या ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी मध्यरात्री तोंडोळी गावातील शेतवस्तीवर राहणाऱ्या परप्रांतीय कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला. आणखी धक्कादायक म्हणजे, दरोडेखोरांनी येथे केवळ लूटच केली नाही तर येथील दोन महिलांवर बलात्कारही केला. यामधील एक महिला 15 दिवसांची बाळंतीण असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखीच गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना नेते संदीपान भूमरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पीडितांचे सांत्वन केले.

बलात्कार पीडित 15 दिवसांची बाळंतीण

तोंडोळी दरोड्यात दरोडेखोरांनी ज्या दोन महिलांवर बलात्कार केला, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. यापैकी एक महिला 15 दिवसांची बाळंतीण असल्याचे उघड झाले आहे. पीडितेची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधींसमोर या महिलेने व्याकुळतेने हंबरडा फोडला. हमारे साथ उन लोगों ने गलत काम किया म्हणत तिने आपली व्यथा मांडली.

शिवसेने नेते संदीपान भूमरेंची घटनास्थळी भेट

दरम्यान, शिवसेना नेते संदीपान भूमरे यांनी तोंडोळीतील घटना स्थळाला भेट दिली. या कुटुंबियांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच तोंडोळी आणि परिसरातील काही वस्तींवर दरोडेखोरांनी केलेल्या लूटमारीचा जलद गतीने तपास करावा, अशा सूचनादेखील संदीपान भूमरे यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

मध्यप्रदेशातील कुटुंबावर दरोडेखोरांचा हल्ला

तोंडोळी येथील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी या कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, तर बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चारपैकी दोन महिलांवर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. यातील पीडिता 31 आणि 32 वर्षीय असून, त्यांना दरोडोखोरांनी घराच्या बाजूला नेत अत्याचार केले. घरातील पुरुषांना शस्त्रांचा धाक दाखवून आधीच बांधून ठेवले हाेते त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. एकाने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख 36 हजार आणि बनावट दागिने लंपास केले.

दरोडेखोरांचे कपडे आढळले, तपास चक्रे वेगाने

दरम्यान, शेकटा रोडवरील शेतात पाण्याच्या हौदाजवळ मोबाइल, कुऱ्हाड, नकली सोन्याचे दागिने व दरोडेखोरांचे बदललेले कपडे आढळून आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, पोलिस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, बिडकीनचे सहायक निरीक्षक संतोष माने हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत बिडकीन येथे ठाण मांडून तपासावर लक्ष ठेवून होते. 11 पथके दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली. यात जालना, बीड येथील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांत पूर्वी काम केलेले व बदलून गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही तपासात सहकार्य घेतले जात आहे.

इतर बातम्या-

पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबात वाद, शिक्षणासाठी पैसे मागितल्याने बायकोला विहिरीत ढकललं

तरुणाला धबधब्यात बुडताना पाहून मित्रांचा पोबारा, घरी वेगळाच बनाव, अखेर तीन दिवसांनी बिंग फुटलं

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.