Aurangabad: तरुणाचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, अभियंत्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
कार्यकारी अभियंत्याने शिवीगाळ केल्यामुळे एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादमधील सिंचन भवनात ही घटना घडली. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपाने दुर्घटना टळली.
औरंगाबादः लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातील सिंचन भवनासमोर मंगळवारी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी वेळीच हस्तक्षेप केल्याने या ठिकाणी सुरु झालेला गोंधळ थांबला.
राहुल वडमारेंचा आत्मदहनाचा प्रयत्न
मंगळवारी (23 नोव्हेंबर) रोजी शहरातील सिंचन भवनासमोर ही घटना घडली. लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्या आरोप राहुल वडमारे या तरुणाने केला. सिंचन भवनासमोर असलेल्या रस्त्यावरूनच अचानक हा तरुण घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल ओतून घेत धावत आला. त्यामुळे या परिसरात काही काळ खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणी वेळीच हस्तक्षेप केला. संबंधित तरुणाला समजावून सांगत ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
घाटीतील समस्या तत्काळ सोडवा, भीमशक्ती संघटनेची मागणी
शहरातील अन्य एका वृत्तानुसार, घाटी रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या सर्व समस्या तत्काळ सोडवा, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बाहेरगावाहन येणाऱ्या रुग्णांसाठी चौकशी कक्ष स्थापन करावा, औषधींच्या नावाखाली सुरु असलेली लूट थांबवावी, सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, आदी मागण्या सोडवल्या नाही तर आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
इतर बातम्या-