Aurangabad: फाइव्ह स्टार हॉटेलच्या शाही विवाह सोहळ्यातून 12 तोळ्यांचे दागिने, दोन लाखांची रोकड लंपास!

औरंगाबादः शहरातील पंचतारांकित हॉटेल अॅम्बेसेडरमधील (Hotel Ambesedar) विवाह सोहळ्यातून दोन चोरट्यांनी तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने (Robbery) आणि दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. तसेच चोरट्यांनी एक मोबाइलदेखील पळवला आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. सिडको, गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशीरा या […]

Aurangabad: फाइव्ह स्टार हॉटेलच्या शाही विवाह सोहळ्यातून 12 तोळ्यांचे दागिने, दोन लाखांची रोकड लंपास!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 3:55 PM

औरंगाबादः शहरातील पंचतारांकित हॉटेल अॅम्बेसेडरमधील (Hotel Ambesedar) विवाह सोहळ्यातून दोन चोरट्यांनी तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने (Robbery) आणि दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. तसेच चोरट्यांनी एक मोबाइलदेखील पळवला आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. सिडको, गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरी मंगलकार्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश नारंग हे व्यापारी असून त्यांच्या मुलाचे खामगाव येथील घोपे कुटुंबियांच्या मुलीशी हॉटेल अँबेसेडरमध्ये मंगळवारी लग्न होते. सकाळपासूनच हॉटेलमध्ये लग्नाची घाई सुरु होती. राजेश यांनी वधूसाठी आणलेले दागिने एका बॅगमध्ये ठेवले होते. परंतु काही वेळाकरिता बॅगकडे दुर्लक्ष झाल्यानंतर चोरट्यांनी या बॅगवर डल्ला मारला.

सिसिटीव्हीत चोर कैद, हर्सूलच्या दिशेने फरार

हॉटेलमधून 12 तोळे सोने आणि इतर मुद्देमाल चोरणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो लग्न समारंभातून दागिने लंपास करणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचेही उघड झाले. त्यानुसार, पोलिसांनी तपास कार्याला वेग दिला. तसेच चोरटा अँबेसेडरमधून बाहेर पडल्यानंतर हर्सूलच्या दिशेने गेल्याचेही सीसीटीव्हीतून समोर आले. गुन्हे शाखा व सिडको पोलिसांची पथके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

इतर बातम्या-

नाशिक जिल्ह्यात 5 नगरपंचायतींची निवडणूक रंगणार; उद्यापासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू

Team india : भारताची टीम दक्षिण आफ्रिकेत जाणं धोक्याचं, भारताचा दौरा रिशेड्यूल होण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.