Crime: लग्नात 36 लाखांचे दागिने चोरणारा अल्पवयीन मध्य प्रदेशातला, धुळ्यातही याच पद्धतीनं केली होती जबरी चोरी
औरंगबााद शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथील लग्नातून 36 लाख रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरणारा 13 वर्षीय अल्पवयीन आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात त्याने धुळ्यातील एका लग्नातही अशीच चोरी केली होती.
औरंगाबादः बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथील लग्नातून 36 लाख रुपयांचे सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरणारा 13 वर्षीय अल्पवयीन आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात त्याने धुळ्यातील एका लग्नातही अशीच चोरी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला बाल समुपदेशन केंद्रात पाठवले होते. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्याने पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चोरी केल्याचे उघड झाले.
धुळ्यात 6 डिसेंबर 2020 रोजी चोरी
सोमवारी औरंगाबादमध्ये नागपूर जिल्ह्यातील धरमपेठ येथील सुनील जैस्वाल यांचा मुलगा नैमिशचे शहरतील संजय जैस्वाल याच्या मुलीसोबत लग्न होते. पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या, निळ्या रंगाचे शर्ट घातलेल्या मुलाने दागिन्यांची बॅग घेऊन पोबारा केला होता. हे फुटेज राज्यभरातील पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर धुळे पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता धुळ्यातील लग्नातून 6 डिसेंबर 2020 रोजी अशाच प्रकारे दागिने चोरणारा हा चोर अल्पवयीन असून तो पचौर तालुक्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. धुळ्यातील पोलिसांनी त्यांला समुपदेशन केंद्रात पाठवले होते. 30 जुलै रोजी समुपदेशनानंतर त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. परंतु बाहेर येताच त्याच्या निकटवर्तीयांनी पुन्हा त्याला चोरीसाठी पुढे नेले, अशी माहिती मोहाडी ठाण्याचे उपनिरीक्षक एम.आय. मिर्झा यांनी दिली.
औरंगाबाद आणि धुळ्यात- चोरीची एकच पद्धत
धुळ्यातील महाडी येथील हॉटेलमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमातूनही या अल्पवयीन चोराने चोरीसाठी अशीच पद्धत वापरली होती. या कार्यक्रमातून हिरे, सोन्याने मढवलेले नेकलेस, कर्णफुले, अंगठी व दागिन्यांसह 5 लाख 58 हजारांची बॅग चोरीला गेली होती. त्याच पद्धतीने सोमवारी औरंगाबादमधील सूर्या लॉन्समध्येही तशीच चोरी केली.
इतर बातम्या-