Tourism: नवीन वर्षाची ट्रिप प्लॅन करताय? जादुई औरंगाबादची ही पर्यटन स्थळं आवर्जून पहाच!

नवीन वर्षात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर औरंगाबादमधील काही महत्त्वाची ठिकाणं तुम्ही आधी पहायला या. कारणएकदा औरंगाबाद शहरात आलात की अगदी काहीच अंतरावर असलेली इथली जगप्रसिद्ध स्थळं तुमची दोन ते तीन दिवसात सहज पाहणं होतील.

Tourism: नवीन वर्षाची ट्रिप प्लॅन करताय? जादुई औरंगाबादची ही पर्यटन स्थळं आवर्जून पहाच!
बीबी का मकबरा, औरंगाबाद
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 7:00 AM

औरंगाबादः वेदनादायी वर्ष सरतंय. आता नव्या वर्षाची चाहूल लागलीय. 2022 मध्ये आता कोणतेही अडथळे नकोयत, कोणतीही निर्बंध नकोयत, अशी इच्छा अनेकजण मनोमन करतायत. वास्तवात कोरोनाचं संकट घोंगावत असलं तरी सध्या तरी नवीन वर्षाचं स्वागत उत्साहानं, नव्या जोमानं करण्यासाठी सगळेच आतुरलेत. त्यामुळे ईयर एंड किंवा नवीन वर्षात जानेवारीच्या गुलाबी थंडित कुठे फिरायला किंवा लहान-मोठ्या ट्रिपचा प्लॅन करत असाल तर औरंगाबादमधली काही ठिकाणं तुम्ही आवर्जून पहाल. तुम्ही मराठवाड्यातील रहिवासी असाल तर इतर राज्यांत प्रवेश करण्याआधी औरंगाबादची ऐतिहासिक स्थळं पाहिलीच पाहिजेत आणि इतर राज्यातले असाल तरीही ही ठिकाणं तुम्ही आवर्जून पहा, कारण त्यानंतरच औरंगाबादला जादुई पर्यटननगरी का म्हटलं जातं, हे तुम्हाला कळेल.

1- दख्खनचा ताजः बीबी का मकबरा

आग्रा येथील ताजमहल जसा प्रसिद्ध आहे तसा मराठवाड्यातील, दख्खनमधील हा ताज. आग्रा येथील ताजमहलच्या धर्तीवर दख्खनमध्येही अशीच विहंगम वास्तू असावी, या हेतूने हा सुंदर मकबरा बांधण्यात आला. मकबऱ्यातील कोरीव नक्षीकाम, त्याठिकाणी वापरण्यात आलेला संगमरवर, मकबऱ्याच्या सुरक्षेसाठी उभी असलेली भक्कम तटबंदी हे सर्वच पाहण्यासारखे आहे. खरा ताजमहल जसा यमुनेच्या तीरावर आहे, तसा इथला ताज खाम नदीच्या तीरावर उभा आहे. औरंगजेब बादशहाने आपली पत्नी दिलरस बानोबेगम ऊर्फ राबिया दुर्रानीच्या स्मरणार्थ ताजमहालची तंतोतंत प्रतिकृती तयार केली. ही सुबक व सुंदल कलाकृती प्रत्यक्ष भेट देऊनच पहायला हवी.

2- तुघलकालाही भुरळ घालणारा अभेद्य दौलताबादचा किल्ला

Daulatabad fort, Aurangabad

दौलताबाद किल्ला, औरंगाबाद

यादव कुळातील भील्लम नावाच्या राजाने 1187 साली पर्वत कोरून तयार केलेला तत्कालीन देवगिरी किंवा दौलताबाद म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला. नेहमीच शक्तीशाली बादशहांसाठी आकर्षण केंद्र ठरलेला हा किल्ला अजिंक्य, अभेद्य या नावानेच मिरवला गेला. या किल्ल्यातूनच संपूर्ण भारतावर शासन केले जाऊ शकत होते. त्यामुळेच बादशहा तुघलकाने हेच राजधानी स्थापन करण्याचे निश्चित केले आणि दिल्लीतून सर्व सैन्य इथे आणले होते.. किल्ल्यातील पायरी विहीर, बरदरी, जलाशय, मीनार विविध वाड्या, मंदिरे, मशीद यासारख्या अनेक वास्तू आहेत. दौलताबादचा किल्ला सुमारे 200 मीटर उंच शंकूच्या टेकडीवर बांधलेला असून त्याला संरक्षणासाठी तीन तटस्थ भिंती आहेत. या भिंतींत काही अंतराने गेट आहेत.

3- जागतिक वारसास्थळ वेरुळची कैलास लेणी

Kailas temple, Aurangabad

वेरूळ येथील कैलास मंदिर

शहरापासून 30 किलोमीटर अंतावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी हे एका राष्ट्रीय स्मारक आहे. इसवीसन पाच ते दहाव्या शतकाच्या कालखंडात तयार करण्यात आलेल्या या लेणीतील कैलास मंदिर हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलेले आहे. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखा कोरलेला आणि आतून द्रविडी शैलीचे हे मंदिर शिल्पकलेचा अद्भुत नमूना आहे. विशेष म्हणजे हे मंदिर फक्त एक खडक कापून त्यातच बांधलेले आहे. कैलासलेणींप्रमाणे येथील इतरही लेण्या, भव्य मंडप, अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराच्या दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे विलक्षण सुंदर आहे.

4- भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर

Ghrushneshwar temple, Aurangabad

घृष्णेश्वर मंदिर, औरंगाबाद

पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमूना म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. लाल रंगाच्या दगडात केलेलं मंदिराचं बांधकाम 4400 चौरस फुटांवर पसरलेलं आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर अहिल्याबाई होळकरांची उत्तम निर्मिती आहे. मंदिराविषयीची आख्यायिका म्हणजे या मंदिराजवळच एक तलाव आहे. या शिवालय तलावाला भेट देणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात.

5- मलिक अंबरची निर्मिती पाणचक्की

Panchakki, Aurangabad

पाणचक्की, औरंगाबाद

औरंगाबादमधील वेरूळ-अजिंठ्यासारखी जागतिक वारसा स्थळं पाहण्यासाठी येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी शहरातील पाणचक्की हेदेखील मुख्य आकर्षण आहे. जगातील अनेक पर्यटक येथील कौशल्यपूर्ण रचना पाहून थक्क होतात. पाण्याच्या प्रवाहावर येथील चक्की चालते. पाणचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील ऊर्जा वापरून चालणारे यंत्रण आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई. त्यामुळे याला चक्की असे नाव पडले. आता हे यंत्र फार उपयोगात नाही, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वापर करून त्या काळी कशा प्रकारे हे यंत्र चालवले जात होते, याचे प्रात्यक्षिक आजही पहायला मिळते. ज्या मलिक अंबरने औरंगाबाद शहर वसवले, त्यानेच येथील नागरिकांना बारा महिने अखंड पाणी पुरवठा व्हावा, या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी हौद बांधले. वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून कार्य कसे करून ग्यावे, याचे उत्तम उदाबरण पानचक्कीच्या रुपाने सर्वांपुढे ठेवले आहे.

इतर बातम्या-

Ram Shinde | कर्जतचं राजकारण तापलं! उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा राम शिंदेचा आरोप

धुळे, अहमदनगर आणि नांदेड- वाघाळा महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी, तर सांगली-मिरज-कुपवाडासाठी 18 जानेवारीला मतदान

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.