पर्यटन स्थळांनाही 50% क्षमतेचा नियम का नाही ? हजारोंचा उदरनिर्वाह ठप्प, बंदी हटवण्याची अंबादास दानवेंची मागणी!

औरंगाबादः राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पर्यटन स्थळे बंद (Aurangabad tourist places) करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. कोरोना काळात अजिंठा लेणीला तिसऱ्यांदा टाळे लागले असून यामुळे पर्यटन व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शहरातील जिम, मॉल, हॉटेल्सना 50टक्के उपस्थितीची सवलत देत सुरु ठेवले आहे, मात्र पर्यटन […]

पर्यटन स्थळांनाही 50% क्षमतेचा नियम का नाही ? हजारोंचा उदरनिर्वाह ठप्प, बंदी हटवण्याची अंबादास दानवेंची मागणी!
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 2:27 PM

औरंगाबादः राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पर्यटन स्थळे बंद (Aurangabad tourist places) करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. कोरोना काळात अजिंठा लेणीला तिसऱ्यांदा टाळे लागले असून यामुळे पर्यटन व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शहरातील जिम, मॉल, हॉटेल्सना 50टक्के उपस्थितीची सवलत देत सुरु ठेवले आहे, मात्र पर्यटन स्थळांना पूर्ण टाळे का ठोकण्यात आले आहे, असा सवाल पर्यटन व्यावसायिक करत आहेत. पर्यटन स्थळांवरही पन्नास टक्क्यांची सवलत देण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे. हॉटेल आणि मॉल्सच्या तुलनेत लेणी परिसरात पुरेसे व्हेंटिलेशन असताना लेणीवरच बंदी का घातली जातेय, असा सवाल केला जात आहे.

अंबादास दानवे यांचे पर्यटन मंत्र्यांना पत्र!

Ambadas Danve letter

आमदार अंबादास दानवे यांचे पर्यटनमंत्र्यांना पत्र

व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांवर ओढवलेल्या या संकटाचा विचार करता, औरंगाबाद शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. हॉटेल आणि मॉल्सप्रमाणे अजिंठा लेणी तसेच इतरही पर्यटन स्थळांवर 50 टक्के नागरिकांची उपस्थिती, असा नियम लागू करून तीदेखील खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती यात करण्यात आली आहे.

पाचशेवर कुटुंबांवर संक्रांत

10 जानेवारी अर्थात सोमवारपासून अजिंठा लेणीचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. फक्त अजिंठा लेणीचा विचार केल्यास या बंदमुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या 73 दुकानदार, 45 डोलीवाहक, 30 रिक्षा व 20 टॅक्सीचालक, 100 फेरीवाले, गाईड, 10 पर्यटक निवासस्थाने, 20 छोटे मोठे हॉटेल्स चालक आदी जवळपास पाचशे लोकांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

दोन वर्षात तिसऱ्यांदा लेणी बंद

मागील दोन वर्षात अजिंठा लेणी तीन वेळा बंद ठेवण्यात आली. 17 मार्च 2020 रोजी पहिल्यांदा अजिंठा लेणीचे दरवाजे बंद करण्यात आले. तब्बल 9 महिने येथे पर्यटकांना येण्यास मज्जाव होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत 12 मार्च 2021 रोजी अजिंठा लेणी दुसऱ्यांदा बंद करण्यात आलीय यावेळी सहा महिने लेणी बंद होती. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असलेली अजिंठा लेणीची यात्राही सलग तिसऱ्या वर्षी रद्द झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाचा हिरमोड झाला आहे.

इतर बातम्या-

Cotton Production : शेवटी बाकी शून्यच ? कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट

Makar Sankrant 2022 | उत्तरायण म्हणजे काय! भीष्म पितामह यांच्या मृत्यूशी काय आहे याचा संबंध ? जाणून घ्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.