PHOTO: अतिवृष्टीग्रस्त औरंगाबादेत भागवत कराडांचा दौरा, कुठे चिखल तुडवला तर कुठे बाइक, ट्रॅक्टरवर स्वारी
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद , कन्नड ,वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात जाऊन थेट नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
1 / 5
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद , कन्नड ,वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात जाऊन थेट नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट शेतावर उतरून चिखल तुडवत गावांची पाहणी केली.
2 / 5
कन्नड तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त 1800 मी. मी. पाऊस झाला असून, कन्नड तालुक्यातील आठ महसूल मंडळापैकी सात महसुली मंडळांमध्ये मंडळामध्ये सात वेळेस अतिवृष्टी यावर्षी झाली अशी माहिती उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांनी दिली . तालुक्यातील खारी नदी मनुर ,शिवना ढेकू नदी वर असलेले किमान सात ते आठ पाझर तलाव पावसाचे पाहुण्याने वाहून गेले . पाझर तलाव फुटले आणि त्यालगत नदीच्या पात्रा शेजारी असलेली वस्ती गावे आणि शेती पूर्णपणे वाहून गेली आहे संपूर्ण वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये किमान सात ते आठ केटीवेअर आणि तलाव वाहून गेले आहेत . या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मोटर सायकल आणि बैलगाडीत जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
3 / 5
सरकारने तातडीने हेक्टरी 50000 रुपये आर्थिक मदत द्यावी ,अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. आता पंचनाम्याची वाट न बघता मदत सरकारने आर्थिक मदत करावी. यासह बँकांचे कर्जाचे हप्ते थांबवावे, विमा कंपन्यांनी शेतीचे नुकसान झाले आहे, त्यामुळे उसाचादेखील विमा मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कन्नडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र कमी असल्याने सोयाबीनच्या विमा उतरवता येत नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली.
4 / 5
कन्नडमधील काही गावांना भेट देण्यासाठी डॉ. भागवत कराड यांनी ट्रॅक्टरमधून सवारी केली.
5 / 5
कन्नडमधील लाखणी मांडकी राहेगाव आणि लासुरगाव मोगल आणि आव्हाळे वस्ती किमान 80 कुटुंबे त्या ठिकाणी राहतात. शिवना नदीचे पाणी या वस्तीवर घुसल्याने शेती वाहून गेली लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले . दरम्यान डॉक्टर कराड यांनी राज्य सरकारने पंचनामे न करता तातडीने मदत जाहीर करावी, मी केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात पाठवीत असून केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना आता मदत देणे आवश्यक आहे, असे आश्वासन दिले. औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी यासंदर्भात मी भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करेन असे यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलेले आहे.