औरंगाबाद: केंद्रीय लोकसेवा आयोगन (Union Public Service Commission), नवी दिल्ली अर्थात युपीएससी मार्फत उद्या 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये विविध केंद्रांवर (Aurangabad center) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी औरंगाबाद शहरात 47 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहे. युपीएससीच्या (UPSC Exam) पूर्वपरीक्षेसाठी उद्या औरंगाबादेतील केंद्रांवर 14504 उमेदवार परीक्षा देतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ तथा परीक्षा समन्वयक निलेश गटने (NIlesh Gatane)यांनी दिली.
युपीएससीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. सदर परीक्षेसाठी एकूण 1989 अधिकारी तथा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता उपस्थित राहतील.
युपीएससीची ही परीक्षा औरंगाबादेत दोन सत्रात होणार आहे. सकाळी 9.30 ते 11.30 वाजता पहिले सत्र पार पडेल. तर दुपारी 14.30 ते 16.30 या कालावधीत दुसऱ्या सत्रातील परीक्षा पर पडेल. जिल्ह्यातील 47 उपकेंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल.
युपीएससीच्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या एक तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रासाठी 8.30 ते 9.20 या वेळेत प्रवेश दिला जाईल तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 13.30 ते 14.20 या वेळेदरम्यानच परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश दिला जाणार आहे.
MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर