औरंगाबादः मागील आठवड्यात शहरातील चंपा चौक परिसरात (Champa Chauk) हातात तलवारी घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police)ताब्यात घेतले आहे. गुरुवारी 24 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चंपा चौकातील बाजारपेठेत एका टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात (Sword Attack) केली होती. तसेच तलवारींनी वाहनांवर वार करायला सुरुवात केली होती. या प्रकरणी पोलिसांनी काल मंगळवारी तिघांना ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी रात्री नऊ वाजता चंपा चौकातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरु होती. दुकानात ग्राहकांची गर्दी होती. तर रस्त्यावरही अनेक वाहनांची ये-जा सुरु होती. तेवढ्यात पटेल आणि त्याच्या टोळक्याने हवेत तलवारी भिरकावत व्यावसायिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकाने बंद करण्याच्या धमक्या सुरु केल्या. तलवारींनी वाहनांवर वार करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दीप गिऱ्हे, निरीक्षक अशोक गिरी, विनोद सलगरकर, उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर ,रोहित गांगुर्डे यांच्याह दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झालं. तोपपर्यंत हे टोळकं तेथून निघून गेलं होतं.
24 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेमुळे चंपा चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. या प्रकरणी आरोपींना शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तायर केली होती. काल शेख अश्फाख शेख इसाक, शेख मुश्ताक शेख इसाक, शाहरूख रहेमतुल्ला खान या तीन युवकांना सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसात विविध भागात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. नशेखोरीचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक टोळ्या तयार झाल्या असून साध्या-साध्या कारणांमुळे वाद, भांडण आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत. सदर चंपा चौक येथील घटना घडण्याच्या आठ दिवस आधीच आरोपी जामीनावर सुटला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने एका टोळीसोबत हाणामारी केली. तर दोन दिवसांनी चंपा चौक परिसरात असा थरार घडवला. त्यामुळे शहरातील वाढत्या गुंडगिरीवर पोलिसांनी लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या-