Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुःखद बातमीः ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील सक्रीय आंदोलक व कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचं मंगळवारी 30 नोव्हेंबर रोजी निधन झालं. 01 डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सक्रीय नेते व वकील या भूमिकेतून त्यांनी अखेरपर्यंत गरजूंना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.

दुःखद बातमीः ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉमरेड मनोहर टाकसाळ यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मनोहर टाकसाळ यांचे निधन
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 6:27 PM

औरंगाबादः ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉमरेड मनोहर टाकसाळ (Manohar Taksal) यांचं वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज 30 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामात (Hydarabad Mukti sangram) त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यांचे पार्थिव खोकडपुरा येथील भाकप कार्यलयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. बुधवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कैलासनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी लिलाबाई, विवाहित मुलगी क्रांती, मुलगा अजय आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सक्रिय असलेला भाकपचा जिल्हा सहसचिव कॉ. अभय, स्नुषा विद्या व मानसी असा परिवार आहे.

अखेरपर्यंत लाल बावट्याची साथ

पेशाने वकील असलेले कॉमरेड मनोहर टाकसाळ हे मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवासी होते. पिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतला. याच काळात त्यांच्यावर साम्यवादाचे संस्कार झाले. तेव्हाहपासून त्यांनी कष्टकरी, गरीबांच्या कल्याणासाठी अनेक लढे लढले. वकील म्हणून उपेक्षितांना न्याय मिळवून दिला. या संपूर्ण काळात त्यांनी लालबावट्याची साथ कधीही सोडली नाही. 1952 पासून ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते. भाकप जिल्हा सचिव ते राष्ट्रीय कौंसिल सदस्यापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झाला. महाराष्ट्र राज्य लालबावटा शेजमजूर युनियनचे ते अनेक वर्षे अध्यक्ष राहिले.

अनेक आंदोलनांत सक्रीय सहभाग

कॉमरेड मनोहर टाकसाळ यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. औरंगाबादमध्येही त्यांनी काही काळ शिवाजी हायस्कूल येथे काम केले. परंतु पक्षाचे काम पूर्ण वेळ करण्यासाठी त्यांनी वकिलीचे शिक्षण घेऊन पुढे वकिलीचाच व्यवसाय सुरु केला. याच पेशाद्वारे त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात ते अग्रणी होते. तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या आवारात मोर्चा काढल्यामुळे 2007 मध्ये त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले होते.

इतर बातम्या-

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ; भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंना टोला

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.