अंत्यसंस्काराला जाण्यासाठी 4 फूट पाण्यातून वाट, खुलताबाद येथील ताजनापूरच्या ग्रामस्थांची पावसाळ्यात दैन्यावस्था
औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे.(Rain in Marathwada region) नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसताना दिसतो. काही गावांना तर पावसाळ्याचे चार महिने कधी एकदा सरतील असे होते. औरंगाबादच्या खुलताबाद येथील ताजनापूर भागातील (Khultabad, Tajnapur, Aurangabad) परिस्थिती समोर आली आहे. इथल्या गावातील नागरिकांना दर पावसाळ्यात अंत्यसंस्काराला जाण्यासाठी चार फूट खोल नदीत उतरून जावे लागते. […]
औरंगाबाद: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे.(Rain in Marathwada region) नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसताना दिसतो. काही गावांना तर पावसाळ्याचे चार महिने कधी एकदा सरतील असे होते. औरंगाबादच्या खुलताबाद येथील ताजनापूर भागातील (Khultabad, Tajnapur, Aurangabad) परिस्थिती समोर आली आहे. इथल्या गावातील नागरिकांना दर पावसाळ्यात अंत्यसंस्काराला जाण्यासाठी चार फूट खोल नदीत उतरून जावे लागते. गाव तसे लहानच असले तरीही अशा अंत्ययात्रेसाठी शेकडो लोक पाण्यात उतरून कब्रस्तानात जातात.
खुलताबाद येथील ताजनापूरची अवस्था
पावसाळा आला की ताजनापूरची अवस्था बिकट होते. ताजनापूर गावची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे. इथे बहुसंख्य मुस्लीम घरे आहेत. मात्र मुस्लीम समाजाचे कब्रस्थान नदीच्या पलीकडे आहे. गावातील प्रमुख रस्त्यापासून कब्रस्थानपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची अंत्ययात्रा नदीपात्रातून नेली जाते. एवढा खडतर प्रवास केल्यानंतर कब्रस्थानात पुढील विधी करता येतात.
रस्ता तयार करण्याची ग्रामस्थांनी मागणी
गावातील एखाद्या व्यक्तीचा पावसाळ्यात मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराची वाट मोठी कठीण होते. मंगळवारीदेखील असाच प्रसंग समोर आला. गावात एका व्यक्तीचे निधन झाले. बुधवारी त्यांचे पार्थिव कब्रस्थानमध्ये नेण्यासाठी नागरिकांना नदीपात्रातून जावे लागले. दोन-तीन दिवस सलग पाऊस सुरु असल्यामुळे नदी पात्रात भरपूर पाणी होते. त्यामुळे चार फूट खोल पाण्यातून प्रवास करत नागरिकांनी पुढील क्रियाकर्म केले. ग्रामस्थांचे हे हाल पाहून प्रशासनाने आता तरी इथपर्यंत रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बुलेट ट्रेनऐवजी ग्रामीण भागातील रस्ते सुधारा
दरम्यान, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनची चर्चा होत आहे. पण मराठवाड्याच्या ग्रामीण भागात रस्ते नससल्याने बैलगाडीतून दूरवर असणाऱ्या रुग्णालयात जाताना दरवर्षी अनेक गरोदर महिलांचा वाटेतच मृत्यू होतो. याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, यावरही चर्चा व्हावी. ग्रामीण भागापर्यंत रस्ते व सरकारी आरोग्य सुविधा पोहोचण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, असा सल्ला मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी नुकताच दिला. औरंगाबादेत नुकत्याच झालेल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात ते बोलते होते.
इतर बातम्या-
Weather Update: पुढचे पाचही दिवस महत्त्वाचे, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा