Aurangabad | वाळूज ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान, महासंचालकांची घोषणा

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यातील पोलीस (Maharashtra police) ठाण्यांची निवड आधी करण्यात आली आहे. त्यात वाळूज पोलीस स्टेशनचा सर्वात प्रथम क्रमांक लागला आहे.

Aurangabad | वाळूज ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान, महासंचालकांची घोषणा
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 3:10 PM

औरंगाबादः वाळूज पोलीस स्टेशन हे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन (Best police station) ठरले आहे. 11 फेब्रुवारी रोजी राज्य पोलीस विभागाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने एका पत्राद्वारे यासंबंधीची घोषणा करण्यात आली. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांकडून (police commissioner) विविध ठाण्यांच्या कामकाजाविषयीचे अहवाल मागवण्यात आले होते. या सर्वांची पडताळणी केल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातलं सर्वात उत्कृष्ट पोलीस स्टेशन निवडण्यासाठी विविध निकष लावण्यात आले होते. देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यातील पोलीस (Maharashtra police) ठाण्यांची निवड आधी करण्यात आली आहे. त्यात वाळूज पोलीस स्टेशनचा सर्वात प्रथम क्रमांक लागला आहे.

राज्यात पहिला येण्याचा मान

राज्यातील पोलीस ठाण्यांमधील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनची निवड करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष लावले जातात. अर्थात यामागे विविध ठाण्यांमधील निकोप स्पर्धा वाढीस लागावी, हाच उद्देश असतो. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना प्रतिबंध, दोषसिद्धी यात सुधारणा व्हावी, याकरिता देश पातळीवर 10 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड केंद्रीय गृहमंत्रालयातून करण्यात येते. या प्रक्रियेत राज्यातील ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढवणे, गुणवत्ता वाढवणे, दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट रितीने काम करणे तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हा तपास आदी हेतू साध्या करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पाच पोलीस ठाण्यांची निवड करून सदर पोलीस ठाण्यांना सन्मान चिन्ह व रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

राज्यातली पाच सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणी कोणती?

पहिले- वाळूज पोलीस स्टेशन आणि दुसरे- यवतमाळ पोलीस स्टेशन तिसरे- जालन्यातील सेवली पोलीस स्टेशन चौथे- सोलापूरमधील जोडभावी पोलीस स्टेशन पाचवे- अहमदनगर येथील राजूर पोलीस स्टेशन अशी क्रमवारी राज्य पोलीस विभागाच्या वतीने जारी करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Zodiac | कोणाचं ऐकतील तर शपथ! असेच असतात या राशीचे लोक, कुठे तुमची रास तर यामध्ये नाही ना ?

Hijab Row: हिजाब आंदोलनाचं लोण कल्याणमध्येही, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या निदर्शनावेळी राडा; महिला आपसात भिडल्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.