औरंगाबादला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, सुटे भाग मिळत नसल्याने दुरुस्तीस एक दिवस विलंब

औरंगाबाद शहराला दोन जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी एक 1400 मिलीमीटर व्यासाची आहे तर दुसरी 700 मिलीमीटर व्यासाची आहे.

औरंगाबादला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, सुटे भाग मिळत नसल्याने दुरुस्तीस एक दिवस विलंब
जलवाहिनी फुटल्यामुळे औरंगाबादेतील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस उशीरावर.
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 10:35 AM

औरंगाबाद: शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी (Water supplying  Duct) गुरुवारी सकाळी फुटली. 700 मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी पैठण रोडवरील कवडगाव ते ताहेरपूर दरम्यान फुटली. त्यामुळे शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम शुक्रवारी सकाळपासून सुरु झाले, मात्र शुक्रवारी रात्रीदेखील उशीरपर्यंत हे काम सुरुच होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

1972 मध्ये टाकलेली जलवाहिनी

औरंगाबाद शहराला दोन जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी एक 1400 मिलीमीटर व्यासाची आहे तर दुसरी 700 मिलीमीटर व्यासाची आहे. ही जलवाहिनी 1972 मध्ये टाकण्यात आली होती. या दुसऱ्या 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला तीस टक्के पाणी मिळते. त्यामुळे आवश्यक तेवढ्या पाण्याचे प्रमाण गाठले जाते. हीच जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलवाहिनी बीडाची असल्याने सुटे भाग मिळेनात

1972 मध्ये टाकण्यात आलेली ही जलवाहिनी बीडाची असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. जलवाहिनी फुटलेला भाग अतिशय छोटा होता. मात्र ती दुरुस्त करण्यासाठी बीडाच्या पाइपलाइनचे सुटे भाग आता मिळत नाहीत. त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत ते काम सुरुच होते. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जायकवाडी येथील पंपहाऊसमधून एक पंप सुरु करण्यात आला. टप्प्या-टप्प्याने पंप सुरु करून पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मुख्य जलवाहिनीच्या कामाला दिवाळीनंतर वेग

दरम्यान, औरंगाबाद शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे काम दिवाळीनंतर सुरु होऊ शकेल, असे संकेत महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटींची नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डिसेंबर 2020 रोजी झाले होते. 4 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. ‘जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 2500 मिली लीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाणार आहे, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, त्यानंतर पाइप तयार केले जातील’, अशी माहिती आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. (Water supplying water Duct in Aurangabad damaged, supply time table will delay)

इतर बातम्या- 

Aurangabad Flood | मानवी साखळी करून विद्यार्थ्यांची सुटका, औरंगाबादेत रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

मेहबुब शेख यांच्या अडचणी वाढल्या, बी समरी रिपोर्ट रद्द, बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.