Aurangabad Weather: मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, येत्या 3-4 दिवसात जोर वाढण्याची शक्यता, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह नांदेड अलर्टवर
औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा दोन दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
औरंगाबाद: मंगळवारी तुफान पावसानं मराठवाड्याला दणाणून सोडल्यानंतर येत्या तीन ते चार दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay Of Bengol) कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain Forecast In Marathwada and Maharashtra) होण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारपासून तर काही ठिकाणी संध्याकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी या भागात जोरदार वृष्टी होण्याचे संकेत प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं जारी करण्यात आले आहेत.
औरंगाबादेत पुन्हा पावसाला सुरुवात
औरंगाबाद शहरात आज संध्याकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. दुपारपासूनच शहरात ढग दाटून आले होते. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी संध्याकाळी ढग आणखी दाटून आल्याने रात्री मुसळधार पाऊस पडतो की काय अशी स्थिती आहे. मात्र हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढचे दोन दिवस म्हणजे 12 आणि 13 तारखेपर्यंत औरंगाबाद आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर अगदी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मात्र येत्या 14 तारखेला म्हणजेच मंगळवारी औरंगाबाद, जालना, परभणी भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी हवामानातील बदलाकडे लक्ष ठेवून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील 3-4 दिवसात महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे I Iयेत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/JYmdPo98tJ भेट द्या pic.twitter.com/0vjrsJ81Zc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 11, 2021
पुढील दोन दिवस मराठवाड्यात मध्यम पाऊस
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मनाबाद, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता फार कमी वर्तवण्यात आली आहे.
13 सप्टेंबरला मराठवाड्यात कुठे अलर्ट?
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या वतीनं जारी केलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच हवामानातील बदलांनुसार येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
14 सप्टेंबरला औरंगाबादेत अलर्ट
औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा जोर दोन दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील आजची पावसाची स्थिती कशी राहील
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, पुणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सातारा, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, अमरावीत, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-
Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता