Weather: औरंगाबाद 5 अंशांनी घसरले, 2 दिवसात मराठवाड्यात वीजांसह पावसाची शक्यता, काय आहे अंदाज?

14 जानेवारीपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची तसेच फळबागांची आणि नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Weather: औरंगाबाद 5 अंशांनी घसरले, 2 दिवसात मराठवाड्यात वीजांसह पावसाची शक्यता, काय आहे अंदाज?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 10:35 AM

औरंगाबादः शहर आणि जिल्ह्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून अचानक बदल (Climate change) जाणवत आहेत. कधी तापमान अचानक वाढतेय तर कधी अचानक तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतोय. आकाशाच ढगांचे अच्छादन दिसून येतेय तर कधी हलका पाऊसही पडतोय. तर कुठे गारपीटही झालेली दिसून येत आहे. कधी हिवाळ्यासारखी थंडी पडतेय तर कधी थंड वाऱ्यांचाही सामना (Weather report) करावा लागतोय. या बदलत्या वातावरणामुळे शहरातील हवा आरोग्यावर परिणाम करणारी ठरतेय.

औरंगाबादचे तापमान 5 अंशांनी घसरले

औरंगाबाद शहराचे तापमान सोमवारी एकाच दिवसात 5 अंशांनी घसरले. सोमवारी हे तापमान 11 अंशांवर पोहोचले. थंडीचा कडाकाही वाढला. मात्र मध्येच बाष्प, उष्ण हवा, आर्द्रता आणि कमी दाबामुळे वातावरणाच कमालीचे बदल जाणवत आहे. उत्तरेतील शीत वारे महाराष्ट्रात दाखल होत असल्याचे हे बदल जाणवत आहे. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊसही झाला.

14 जानेवारीपर्यंत पावसाचेच ढग

थंड वारे, बाष्प, उष्ण हवा, आर्द्रता आणि कमी दाबामुळे विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. येत्या 14 जानेवारीपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची तसेच फळबागांची आणि नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दामिनी अॅपद्वारे शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी

शेतकरी बांधवांनी विजांच्या कडकडाटाची पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन दामिनी हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini

राज्यात काय स्थिती?

राज्यात सोमवारी नाशिकचे किमान तापमान सर्वात कमी 7.3 अंश तर जळगावचे तापमान 9 अंशांवर घसरले. राज्यातील इतर शहरांच्या तापमानात 1 ते 3 अंशांपर्यंत कुठे वाढ तर कुठे घसरण दिसून आली. यवतमाळचे कमाल तापमान 7 अंशांनी घसरले. त्यानंतर चंद्रपूर 6 अंश म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई, कुलाबा, गोंदिया, नागपूर, वर्ध्याच्या तापमानात 5 अंशांची घसरण दिसून आली.

इतर बातम्या-

Ramdas Athavale|फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, शिवसेनेनं भाजपसोबत यावं, आठवलेंनी आळवला युतीचा राग!

Birthday Special : टीव्हीवरील मालिकेने करिअरची सुरुवात करणारी आम्रपाली दुबे आज बनली सुपरस्टार!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.