पंढरपुरात लढले, अंधेरीत नाही लढले, यातला फरक काय?; रावसाहेब दानवेंना विचारा
शरद पवार, राज ठाकरे यांनी मध्यस्ती करायला लावली.
दत्ता कनवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, खरं म्हणजे अंधेरीची (Andheri by-election) जागा आम्ही भाजपला सोडली होती. ती लढाईची की, नाही लढायची तो निर्णय भाजपचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अंधेरीची जागा भाजपला सोडली. त्यानंतर वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली असेल. ही निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलं होईल, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळं ही पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असावा, असं मला वाटतं, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
भाजपला पराभव दिसत होता. त्यामुळं माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावर अब्दुल सत्तार म्हणाले, श्री. लटके यांचं निधन झाले. त्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उमेदवारी लढवत आहेत. सर्व नेत्यांची सहानुभूती ही लटके यांच्याकडं आहे. त्यामुळं इतरांनीही आपली उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, अशी विनंतही अब्दुल सत्तार यांनी केली.
ऋतुजा लटके या सामान्य कुटुंबातल्या महिला आहेत. महापालिकेतील कर्मचारी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांना बिनविरोध निवडून दिल्यास अशी परंपरा पुढंही सुरू राहावी, असं मला वाटतं.
शरद पवार, राज ठाकरे यांनी मध्यस्ती करायला लावली. श्री लटके यांनी विधानसभेत, महापालिकेत चांगलं काम केलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही जागा मिळावी. हा चांगला निर्णय आहे.
अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, शब्दाची नव्हे विकासाची बाणं चालवावीत. सर्व संमतीनं विकासाची बाणं चालवावीत. राज्यात शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, ग्रामीण भागाचे प्रश्न आहेत. सत्ताधारी पक्षानं पुढाकार घेतला आहे. पुढं याचे परिणाम दिसतील.
एकजुटीनं, एकमतानं सर्वपक्षीय निवडून देऊ लागले. याचा अर्थ एकमताची संमती आहे, असा निघतो. पंढरपुरात लढले. अंधेरीत नाही लढले यातला फरक रावसाहेब दानवेचं सांगू शकतात. माझ्या बाजूला बसले आहेत. तेच याचं सोयीस्कर उत्तर देऊ शकतात, असं अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.