स्वयंपाकाला कोणते तेल वापरू? लाकडी घाण्याचे की रिफाइंड तेल टाकू? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात

कोणत्याही पॅकिंगच्या आणि घाण्याच्या तेलाच्या दरात 150 रुपये प्रति किलोची तफावत येते. मात्र तेल वापरण्याचे प्रमाण कमी ठेवल्यास घाण्याचे तेलही परवडू शकते, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

स्वयंपाकाला कोणते तेल वापरू? लाकडी घाण्याचे की रिफाइंड तेल टाकू? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतात
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 1:49 PM

औरंगाबाद: दसरा-दिवाळी म्हटलं (Diwali season) की, खमंग कुरकुरीत चकल्या, शेव, शंकरपाळे.. अशा चमचमीत पदार्थांची (Tasty Recipes) रेचलेल असते. तेलकट, तुपकट खाऊ नका, असा डॉक्टरांच्या या सल्ल्याला उत्सवाच्या काळात सर्रास फाटा मारला जातो. पण कोरोना काळानं पुन्हा एकदा लोकांमध्ये आरोग्यप्रती जागृती झाली आहे. आपल्या शरीरप्रकृतीसाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत, कोणते तेल खाणे योग्य, याचा लोक कटाक्षाने विचार करू लागलेत. त्यातच बाजारात अनेक प्रकारचे खाद्य तेल विक्रीला आहेत. सध्या तर पारंपरिक पद्धतीच्या लाकडी घाण्यापासून (Wood pressed oil) बनवलेल्या तेलाचीही नव्याने विक्री सुरु झाली आहे. मग हे तेल चांगलं की किराणा दुकानांवर असलेले पॅकिंगचे (Packing oil) तेल चांगले, असा संभ्रम नागरिकांसमोर आहे.

पॅकिंगच्या तेलात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक

आहारतज्ज्ञांच्या मते, नामांकित कंपन्या रिफाइंड तेल आरोग्यासाठी किती चांगले आहे, याची जाहिरात करत असतात. मात्र खाद्य तेल रिफाइंड करताना त्याला तीन वेळा 300 डिग्रीपर्यंत तापवले जाते. यामुळे तेलातील सर्व जीवनसत्वे नष्ट होतात. ही जीवनसत्वे आम्ही नव्याने तेलात टाकतो, असा दावा कंपन्या करतात. पण त्यात कितपत तथ्य असते, हे सांगता येत नाही. अशा तेलात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. लाकडी घाण्याचे तेल घेतानाही ते सुटे घेत असाल तर विश्वासातील व्यक्तीकडूनच घेणे चांगले. कारण त्यातही पुन्हा भेसळ होण्याचा धोका असतो.

हृदयाची काळजी घ्या, रिफाइंड तेल टाळा

रिफाइंड तेलात हृदयविकारासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे जिथे घाण्याचे तेल उपलब्ध असते, तेथील नागरिकांनी शक्यतोवर हेच तेल वापरण्याचा सल्ला हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे. घाण्याच्या तेलात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते, जे हृदयासाठी चांगले असते. यात निसर्गतःच तेलात मिळणारे जीवनस्त्व आढळतात. त्यामुळे घाण्याचे तेल खाणे अधिक फायद्याचे ठरते, असा सल्ला आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी दिला आहे.

घाण्याचे तेल महाग, मग काय करु?

बाजारात सध्या विविध ठिकाणी घाण्याचे तेल आणि पॅकिंगचे तेल असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. घाण्याचे तेल शरीरासाठी उत्तम असल्याचे डॉक्टर सांगत असले तरीही किंमतीतील प्रचंड तफावतीमुळे सामान्य नागरिक पॅकिंगच्या तेलालाच प्राधान्य देतात. औरंगाबादमध्ये करडई आणि शेंगदाण्याच्या घाण्याच्या तेलाची जास्त विक्री होते. करडईचं घाण्याचं तेल 330 रुपये किलो आहे तर पॅकिंगच्या तेलाची किंमत 220 रुपये लीटर आहे. अशा प्रकारचे कोणत्याही पॅकिंगच्या आणि घाण्याच्या तेलाच्या दरात 150 रुपये प्रति किलोची तफावत येते. मात्र तेल वापरण्याचे प्रमाण कमी ठेवल्यास घाण्याचे तेलही परवडू शकते, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

एका व्यक्तीने एका महिन्यात किती तेल खावे?

आहातज्ज्ञांच्या मते, एका व्यक्तीने एका महिन्यात अर्धा लीटर तेलच वापरले पाहिजे. अशा रितीने चार माणसांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त दोन लीटरच तेल वापरले पाहिजे. योग्य रितीने नियोजन केले तर आपले आरोग्य टिकवणे आपल्याच हाती आहे. अन्यथा जास्त तेल खाणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

ईट लोकल, ईट नॅचरल, ईट सिझनल

ज्या भागात ज्या तेलबियांचे उत्पादन होते, त्या भागातील नागरिकांनी त्याचेच तेल खावे, हे साधे समीकरण आहे. तसेच हंगामी तेलबियांचेही तेल खाणे उत्तम आहे. औरंगाबादेत करडई, जवस, शेंगदाणा या तेलबियांचे उत्पादन घेतले जाते तर इथल्या नागरिकांनी हेच तेल आहारात वापरले पाहिजेत. खोबरेल तेल, मोहरीचे तेल, तीळाचे तेल थेट आहारात वापरणे आपल्याकडील स्थानिकांच्या आरोग्यासाठी फार प्रभावी ठरत नाही. त्यातच घाण्याचे तेल खाल्ले तर शरीरासाठी हे अपायकारक ठरत नाही. कारण प्लॅस्टिकच्या पॅकिंगमध्ये असलेल्या तेलात प्लॅस्टिकचाही कंटेंट उतरलेला असतो, त्यामुळे हे तेल सहसा टाळलेलेच बरे, असा सल्ला औरंगाबाद येथील आहारतज्ज्ञ प्राची डाकेते, यांनी दिला आहे.

इतर बातम्या- 

सावधान… तुमच्या रोजच्या आहारातील गहू- तांदळाची पौष्टीकता होतेय कमी ?

Skin Care : फेस वॅक्सिंग ट्राय करत आहात? तर ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.