VIDEO: शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? शिवसेना खासदारानं इनसाईड स्टोरी जगजाहीर केली, बघा काय म्हणाले?
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर आघाडीतील नेते सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. (will shivsena fight 2024 assembly elections with ncp and congress?, read inside story)
जालना: येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर आघाडीतील नेते सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र, शिवसेनेचे परभणीतील खासदार संजय जाधव यांनी मात्र, या युतीची शक्यताच फेटाळून लावली आहे. संजय जाधव यांनी युती का होणार नाही याची इन्साईड स्टोरीच सांगितली. (will shivsena fight 2024 assembly elections with ncp and congress?, read inside story)
संजय जाधव जालन्यात आले होते. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना जाधव यांनी येथेच्छ फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील युतीवरही भाष्य केलं. युती होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हणले तरी होणार नाही. तुम्ही उद्या म्हणले करा तरी होणार नाही. कारण विधानसभेत कुणी ती जागा घ्यायच्या इथून सुरू आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही युती होत नाही. झाली तर लोकसभेला होईल. तीही त्यांची गरज म्हणून होईल. आपली गरज म्हणून नाही. पण विधानसभेत युती होईल असं वाटत नाही, असं ते जाधव. विधानसभेत युती होणार नाही हे माझं अॅनालिसिस आहे. हे व्यक्तिगत मत आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होत नाही. आपली आणि भाजपची जागेवरून झाली नाही. मग तीन पक्षांची कशी होणार? कोणी कोणी काय घ्यायचं आणि काय द्यायचं?, असा सवालही त्यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढू
आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. निवडून आल्यावर युती होईल न होईल. युती करायची की नाही हा आपला अधिकार आहे. पण उद्याच्या निवडणुका आपल्याला आपल्या ताकदीवर लढायच्या आहेत. त्यासाठी आजपासून गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही मोहीम राबवावी लागेल. सर्वांचा डेटा तयार करा. त्या व्यक्तिच्या सुखादुखात सहभागी व्हा. विधानसभेत जिथे यश येईल असं वाटत होतं तिथे मागे यावं लागलं. त्या ठिकाणी काम करा. चार पावलं मागे घेऊन पुढे या. येणारी निवडणूक आपल्याच विजयाची असेल, असंही ते म्हणाले.
निवडणूक कशी हरलो? उकीरडे उकरण्यात अर्थ नाही
विधानसभेची निवडणूक आपण कशी हरलो काय झालं आता हे सगळं वारकाचे उकीरडे उकरीत बसण्यात काही अर्थ नाही. आम्ही हरलोत. आता आम्हाला पुन्हा जिंकायचे असेल तर तहान लागल्यावर विहीर खोदून नाही होणार तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्हाला जिंकाव्या लागतील. उद्याची विधानसभा जिंकण्यासाठी तोच आमचा पाया असेल. म्हणून उद्या जिल्हापरिषदा, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुका असतील खरेदी-विक्री संघ, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्याही असेल या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला सक्षम उमेदवार त्या त्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल. नाही तर आम्ही एक रेटतोय, दुसरा दुसराच रेटतोय… तिसरा तिसरा रेटतोय, कार्यकर्ता चौथाच म्हणतो या खिचातानीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
आतापासूनच तयारी करा
एकवाक्यता ठेवा. एका एका सर्कलमध्ये कुणाला उभं करायचं कोण उभं राहू शकतं. कोण चांगली ताकदवाला आहे. कोण लोकप्रिय आहे. त्या त्या सर्कलमधील लोकांना माहीत असतं. त्यामुळे आतापासूनच तयारी करा. आज गाव तिथे शिवसेनेची शाखा, युवासेनेची शाखा तयार करा. बोर्डावर कुणाचं नावच टाकायचं नाही. ‘शिवसेना शाखा घनसावंगी आपलं सहर्ष स्वागत करत आहे’ असा बोर्डच गावाच्या वेशीवर ठेवा. म्हणजे त्यात सर्वांचंच नाव आलं. बबलूचं नाव टाकलं की तिकडे उद्धवला राग, उद्धवचं टाकलं की आप्पाला राग.. हा राग लोभच नको. ते शहागडवाले लांबच राहिले पुन्हा… त्यामुळे कुणाचं नावच न लिहिण्याची संकल्पना मांडल्याबद्दल अंबादास दानवेंचं अभिनंदनच केलं पाहिजे. शिवसेनाही आपल्यासाठी सर्व काही आहे. शिवसेनेचं नाव बोर्डावर आलं म्हणजे सर्वांचंच नाव आलं. आम्ही परभणीतही हे अभियान सुरू केलं आहे. मी सर्वांना बोर्ड दिले. घनसावंगीलाही मी बोर्ड देईन, असं त्यांनी सांगितलं.
बापाची जहांगीरच आहे
एका दुकानासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली, कमिशनरपर्यंत तक्रारी केली. कमिशनरने आदेश दिले. दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, असं कमिशनरने सांगितलं. एवढं असताना सुद्धा पुन्हा भुजबळ साहेबांनी पत्रं दिलं. याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं भुजबळ म्हणाले. जसं काही यांच्या बापाची जहांगीरच आहे, अशी टीका त्यांनी भुजबळांवर केली.
राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ
आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत. काल जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता. तुम्हाला सगळं जमतं. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जे काही आदेश येईल ते मान्य केलं. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं ते म्हणाले.
दोन वर्षे झाले खासदार निधीच नाही
दोन वर्षापासून आम्हाला खासदार निधीच नाही. पहिल्या वर्षी अडीच कोटी मिळाला होता. त्यामध्ये मी दादांच्या निवडणुकीसाठी मी 50-60 लाखांचा निधी घनसावंगीत दिला होता. आता दोन वर्षापासून काहीच नाही. कार्यकर्त्यांचा रोज फोन येतो आमचं काही आहे की नाही. आमच्याकडे बघता का नाही. मग डीपीडीसीतून मला एक कोटी रूपये मिळाले होते. त्यातील एक लाख रुपये मी घनसांवगीलाच दिले. 30 लाख परतूर विधानसभेला दिले. त्या त्या गावाला दहा लाखांचा निधी पदाधिकाऱ्यांना दिला. मी काही उत्तेकरांना निधी देत नाही. जो संघटनेचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे. त्याला आपण निधी देतो. त्याची चहाही आपण कधी पीत नाही. पिणारही नाही. प्रश्नच नाही. पण शेवटी आडातच नाही तर पोहऱ्यात आणायचं कुठं? आता 2022मध्ये आमचा निधी मोकळा होईल. मोकळा झाल्यावर तुम्हा सर्वांना मोकळं करू. चिंता करू नका, असं ते म्हणाले. (will shivsena fight 2024 assembly elections with ncp and congress?, read inside story)
संबंधित बातम्या:
डॅशिंग अधिकारी आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी, नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण
आम्हाला डॅशिंग अधिकारी आंचल गोयल याच जिल्हाधिकारी हव्यात, परभणीकरांचं आंदोलन, सरकार दखल घेणार?
(will shivsena fight 2024 assembly elections with ncp and congress?, read inside story)