वाइनचा वाद औरंगाबादेत अवतरला, दारुबंदीची चर्चा दिल्लीपर्यंत गेली, जि.प. बैठकीत घमासान!

क्रवारी स्थायी समितीची बैठक सुरु होताच, भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी सर्वात आधी माइक हातात घेत, वाइनच्याच चर्चेला सुरुवात केली. किराणा दुकानांमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय रद्द करावा, असा ठराव घेऊन तो राज्य शासनाला पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

वाइनचा वाद औरंगाबादेत अवतरला, दारुबंदीची चर्चा दिल्लीपर्यंत गेली, जि.प. बैठकीत घमासान!
औरंगाबाद जिल्हा परिषद
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 10:09 AM

औरंगाबादः आता मॉल आणि सुपरमार्केटमध्येही वाइन (Wine Sales) विकता येणार, या राज्य सरकारच्या नव्या धोरणावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. याचे पडसाद औरंगाबाद जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. ग्रामीण भागातली विकासकामं (Aurangabad development) आणि समस्या मार्गी लावण्यासाठी खरं तर ही बैठक आयोजित करण्यात आली. मात्र शुक्रवारी सुरु झालेल्या या बैठकीत अचानक वाइन वादाची एंट्री झाली. राज्यातील वाइन विक्रीला परवानगी (Mahavikas Aghadi) देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, असा ठराव घेऊन तो राज्य शासनाला पाठवावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीही यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. हा वाद आपण दिल्लीपर्यंत नेऊ, अशाही चर्चा झडल्या. अखेरीस बैठकीतील विषयपत्रिकेवरील मुद्द्यांना हात घालण्यासाठी दुपारी साडेतीनचा मुहूर्त सापडला.

वाइनवरून काय काय वक्तव्य?

शुक्रवारी स्थायी समितीची बैठक सुरु होताच, भाजपचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी सर्वात आधी माइक हातात घेत, वाइनच्याच चर्चेला सुरुवात केली. किराणा दुकानांमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय रद्द करावा, असा ठराव घेऊन तो राज्य शासनाला पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. आधीच ग्रामीण भागातील तरुण व्यवसाधीन झाला आहे. त्यात सरकारचा निर्णय म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राची बरबादी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यालाच प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे सभापती किशोर बलांडे यांनी हा विषय थेट दिल्लीपर्यंत नेला. राज्यातील वाइनच काय, तर पूर्ण देशभरात दारूबंदी करावी, असा ठराव घेऊन आपण तो केंद्र सरकारला पाठवू, असा पलटवार त्यांनी केला. त्यामुळे भाजपचे वालतुरे आणि शिवसेनेचे बलांडे यांच्याच चांगलीच वादावादी झाली.

दारुबंदी झाली तर तुम्ही निवडून कसे याल..?

भाजपचे वालतुरे याचे कोंडी करण्यासाठी शिवसेनेचे केशव तायडे यांनीही वेगळाच तर्क मांडला. ते म्हणाले, एक किलो द्राक्षापासून 700 एमएम अर्क तयार होतो. त्याला द्राक्षासव म्हणतात. ते आरोग्यासाठी हानिकारक नसते. तसेच वाइन ही गोरगरीब जनता पीत नाही. ते श्रीमंत लोकांचे पेय आहे. वाइनला निरोध म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विरोध केल्यासारखे आहे, असे तायडे म्हणाले. दरम्यान, हा वाद सुरु असतानाच एक महिला सदस्य वाद घालणाऱ्या सदस्यांना उद्देशून म्हणाल्या, दारुबंदी झाली तर तुम्ही निवडून कसे याल…यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर विषय पत्रिकेतील विषय घेण्यासाठी दुपारी साडे तीनचा मुहूर्त सापडला आणि विकासकामांवरची चर्चा सुरु झाली.

इतर बातम्या-

डावी-उजवी विचारधारा म्हणजे काय रे भाऊ? या विचारधारा आल्या कशा? जनक कोण?

Vasant Panchami 2022 | देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी अर्पण करा, मनोकामना पूर्ण होतील!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.