मनपा निवडणूक: औरंगाबाद शहरातील प्रभागाच्या कच्च्या नकाशांचे काम सुरु, वॉर्डांच्या सीमारेषा नव्याने आखल्या जाणार

औरंगाबाद: महापालिकेची आगामी निवडणूक (Aurangabad municipal corporation ) लक्षात घेता, राज्य निवडणूक आयोगाने (State election comission) महापालिका प्रशासनाला शहरातील प्रभागांचा कच्च्या स्वरुपातील आराखडा तयार करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने झोन कार्यालयनिहाय प्रभागांचे कच्चे नकाशे तयार करण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कच्चे नकाशे तयार करताना सध्या अस्तित्वात असलेल्या […]

मनपा निवडणूक: औरंगाबाद शहरातील प्रभागाच्या कच्च्या नकाशांचे काम सुरु, वॉर्डांच्या सीमारेषा नव्याने आखल्या जाणार
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नव्या प्रभागरचनेसाठी नकाशांचे काम सुरु
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 12:27 PM

औरंगाबाद: महापालिकेची आगामी निवडणूक (Aurangabad municipal corporation ) लक्षात घेता, राज्य निवडणूक आयोगाने (State election comission) महापालिका प्रशासनाला शहरातील प्रभागांचा कच्च्या स्वरुपातील आराखडा तयार करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार पालिका प्रशासनाने झोन कार्यालयनिहाय प्रभागांचे कच्चे नकाशे तयार करण्याचे काम सुरु केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कच्चे नकाशे तयार करताना सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतेक सर्व वॉर्डांच्या सीमारेषा नव्याने ठरविल्या जातील, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.

यंदा तीन वॉर्डांचा एक प्रभाग

यापूर्वी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एक वॉर्ड एक प्रभाग या पद्धतीने होत असे. मात्र आता राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाने तीन वॉर्डांचा एक प्रभाग करुन निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर या आदेशानुसार प्रभाग रचना करण्याच्या सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कच्चे नकाशे तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.

औरंगाबादची प्रभाग रचना न्यायप्रविष्ट

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा मद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. तीन वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार निवडणूक घेण्याच्या दृष्टीने सध्या सूचना दिल्या असल्या तरीही न्यायालयात असलेली निवडणूक याचिका निकाली निघाल्यानंतरच महापालिकेच्या निवडणुकीसंबंधी पुढील प्रक्रिया होईल, असे म्हटले जात आहे. प्रभाग रचनेसंबंधी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रभागरचनेचे काम कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर आहे. याविषयी सरकार किंवा निवडणूक आयोगाकडून उत्तर येईपर्यंत प्रभागांचा कच्चा आराखडा व नकाशे तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

दोन्ही निकालांसाठी मनपाची तयारी

न्यानालयाने एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याच्या बाजूने निकाल दिला तर त्याचा आराखडा पालिकेकडे तयारच आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला तर प्रभाग रचनेत वेळ जाऊ नये या उद्देशाने कच्चा आराखडा व नकाशे तयार करण्याचे काम झोन कार्यलयनिहाय सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या वॉर्डांच्या सीमारेषांमध्ये नव्या आराखड्यात मोठे बदल असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

इच्छुकांचा जीव टांगणीला

निवडणूक येताच प्रचाराच्या तयारीला लागणाऱ्या उमेदवारांना औरंगाबादमधील न्यायालयीन पेचप्रसंगामुळे मात्र काहीच हालचाल करता येत नाही. नव्या नियमानुसार तीन वॉर्डांची प्रभाग रचना झाल्यास अनेक लहान उमेदवारांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल एक सदस्यीय रचनेकडून लागतोय का तीन सदस्यीय प्रभागाकडून याकडेच उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

एकाच वॉर्डात समाजसेवा करणाऱ्यांना फटका

स्थानिक नेत्यांच्या मते, एक सदस्यीय वॉर्डरचना चांगली होती. बहुसदस्यीय रचना झाल्यावर आधीच्या दुसऱ्या वॉर्डात कसे मतदान होते, यावरही लक्ष द्यावे लागेल. तसेच आपल्यासोबतचे उमेदवार कसे असतील, यावरही बरेच काही अवलंबून आहे. अनेक नगरसेवक खूप मेहनत घेऊन आपापल्या वॉर्डासाठी कार्य करत असतात. मात्र प्रभाग रचना विस्तारल्याचा फटका अशा कार्यकर्त्यांना बसेल.

इतर बातम्या-

Satara District Bank Election | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 21 नोव्हेंबरला मतदान

देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांतदादांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.