औरंगजेबाचा फोटो ठेवून ‘बाप तो बाप रहेगा’ असे स्टेटस, हिंदुत्वादी संघटना संतप्त, रास्ता रोको आंदोलन
औरंगजेबचा फोटो लावून 'बाप तो बाप रहेगा' असे स्टेटस ठेवल्यामुळे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे हिंदू संघटनाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमरगा - लातूर महामार्गावर नारंगवाडी पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राज्यात औरंगजेबच्या विषयावरुन काही समाजकंटक वाद निर्माण करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास असलेल्या महाराष्ट्रात औरंगजेबचे गुणगाण गाणारे समाजकंटक मिळत आहे. या विषयावरुन दोन-तीन दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार झाला होता. त्यानंतर आता धारशिवमध्ये आंदोलन पेटले आहे. एका समाजकंटकाने औरंगजेबाचा फोटो ठेवून स्टेटस ठेवले. त्यात त्याने ‘बाप तो बाप रहेगा’ असे स्टेटस ठेवत तमाम शिवप्रेमींना डिवचले. यामुळे हिंदुत्वादी संघटाना आक्रमक झाल्या. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. दरम्यान औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
औरंगजेबचा फोटो लावून ‘बाप तो बाप रहेगा’ असे स्टेटस ठेवल्यामुळे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे हिंदू संघटनाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमरगा – लातूर महामार्गावर नारंगवाडी पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. पोलिसांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तीन तास आंदोलन
उमरगा – लातूर महामार्गावरील नारंगवाडी पाटीजवळ तीन तासांपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. घटनास्थळी उमरगाचे डीवायएसपीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली. औरंगजेबाचा फोटो ठेवून बाप तो बाप रहेगा असे स्टेटस ठेवणारा मुलगा अप्लवयीन असल्याचे समोर आले आहे. स्टेटस ठेवणाऱ्या मुलाला आणि मुलाच्या वडिलांना उमरगा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. उमरगा पोलीस स्टेशनमध्ये स्टेटस ठेवणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





धारशिव जिल्ह्यात आंदोलन
नागपुरात संचारबंदी हटवली
दरम्यान, नागपुरातील नंदनवन आणि कपिल नगर या दोन पोलीस स्टेशन हद्दीमधील संचारबंदी पूर्णता उठविण्यात आली आहे. तर काही पोलीस स्टेशन अंतर्गत दोन तास शिथीलता संचारबंदीत देण्यात आलेली आहे. गणेशपेठ, कोतवाली, तहसील पोलीस स्टेशन भागात संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम असणार असणार आहे. एकूण 91 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात 11 अल्पवयीन आरोपी आहेत, असे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले.
नागपूर घटनेचे बांगलादेश कनेक्शन आहे का? याबद्दल आम्ही तपास करत आहोत, असे पोलीस आयुक्त सिंगल यांनी सांगितले. ज्या, ज्या गोष्टी समोर येतील त्या सगळ्या गोष्टीचा तपास झाल्यानंतरच याबद्दल सांगता येईल. मास्टरमाइंड असलेल्या फइम खान याची सगळी हिस्टरी तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले.