धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे टाळा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

पावसाला सुरुवात झाली की लोकं सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. पण काही ठिकाणं ही पावसाळ्यात अतिशय धोकादायक ठरु शकतात. ज्याठिकाणा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा बुडून मृत्यू होतो. तर काही ठिकाणी लोकं वाहून जातात.

धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे टाळा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 11:06 PM

प्रादेशिक हवामान खात्याने ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी असल्याने या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी तसेच धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणे टाळावे. नदीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

पावसाळा सुरु झाला की धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाल्याने अनेक हौशी पर्यटक फेसाळणाऱ्या धबधब्यांचा आंनद घेण्यासाठी धबधब्याखाली जमतात. सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची गर्दी इतकी असते की, यंत्रणाही कमी पडते. पण धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे. धबधबे वाहत असताना अनेकदा पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असते.

गेल्या काही दिवसात झालेल्या अपघाताच्या घटनांपासून सावध राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. अनेक पर्यटक पर्यटनासाठी डोंगर, दऱ्या अन् धबधबे असलेल्या ठिकाणी जातात. पण या ठिकाणी नको ते धाडस केल्याने जीव धोक्यात घातलतात. पण असे करणे कधी कधी  चांगलेच महागात पडू शकते.

लोणावळ्यातील भुशी डॅम्पच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर काही दिवसांपूर्वीच मोठी दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जण अचानक पाण्याचं फ्लो वाढल्याने वाहून गेले होते. पाऊस पडत असताना कधीही पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. ज्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो. अशा कारणानेच प्रशासनाकडून अशा ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन केले आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून पोलीस देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.