Baba Siddiqui case : बाबा सिद्दिकींवर आरोपींनी एवढ्या गर्दीतही अचूक निशाणा कसा साधला? गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
बाबा सिद्दिकी प्रकरणात पोलिसांच्या हाती नवी माहिती लागली असून, या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक गोळीबाराची घटना घडली होती.आरोपींनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी हे आपला मुलगा झिशान सिद्दिकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते.त्याचवेळी आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. दसऱ्याच्या दिवशी फटाके फुटत असताना झालेल्या गोंधळात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबा केला. दरम्यान यावेळी आणखी एका व्यक्तीला गोळी लागली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एकूण दहा आरोपींना अटक केली आहे. रोज नवे खुलासे समोर येत आहेत.आता या प्रकरणात सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात तीन आरोपींचा समावेश होता. त्यातील दोघांना पोलिसांनी तात्काळ पकडलं मात्र एक जण गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. आतापर्यंत या गोळीबार प्रकरणात दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीमधून दररोज नवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर फायरिंग करण्यापूर्वी आरोपींनी झाडांवर गोळीबार करून प्रॅक्टिस केली होती.आरोपींनी कर्जत-खोपोली रोडवर असलेल्या धबधब्याजवळील पलसदरी गावातील जंगलात प्रॅक्टिस केली होती, आणि त्यानंतर त्यांनी गोळीबार केला.
लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन
दरम्यान या हत्येचं लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन देखील समोर आलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगनं सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी घेतली होती. मात्र पोलिसांकडून इतर अँगलनं देखील या हत्येचा तपास सुरू आहे. या प्रकरणाता आता आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.