backward class commission report | मागासवर्गीय अहवाल मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांचे पहिले महत्वाचे वक्तव्य

backward class commission report | मराठा आरक्षणाबाबतची सर्वात महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासर्वगीय आयोगाचा अहवाल आला आहे. मराठा समाज हा मागास आहे, हे या अहवालातून पुढे आले आहे.

backward class commission report | मागासवर्गीय अहवाल मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांचे पहिले महत्वाचे वक्तव्य
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 10:14 AM

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाबाबतची सर्वात महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासर्वगीय आयोगाचा अहवाल आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज हा अहवाल देण्यात आला. या अहवालातून मराठा समाज हा मागास आहे, हा निष्कर्ष असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. राज्य मागासवर्गीय आयोगाने रात्रंदिवस काम केले. सुमारे चार लाख लोकांनी ही जबाबदारी पार पडली. यामध्ये अनेक लोकांनी मदत केली. यामुळे हा अहवाल जलदगतीने तयार झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल. त्यासाठी विशेष अधिवेशन २० फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अधिवेशनात त्या अहवालावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजास मिळणार आहे. यामुळे दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. यामुळे मागावर्गीय आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.

आता कायद्याच्या चौकटीतील आरक्षण

मागासवर्गीय आयोगाचा हा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल. त्यामध्ये चर्चा करुन शासन पुढील निर्णय घेईल. त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला होणार आहे. त्यात अहवालावर चर्चा होणार आहे. अहवाल तयार करण्याच्या या कामात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त या सगळ्यांची टीम काम करत होती. जवळपास 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांच सर्वेक्षण यात करण्यात आले.

ज्या पद्धतीने काम झाले आहे, त्यामुळे शासनाला विश्वास आहे की, मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक मागसलेपणावर टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मिळेल. ओबीसी आरक्षणाला कोणतही धक्का न लावता तसेच इतर समाजावर अन्याय न करता हे आरक्षण असणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोणाचे आरक्षण काढणार नाही

कुठल्याही समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची सरकारची भूमिका नाही. इतर समाजावर अन्याय करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका नाही. सर्व समाजाला आम्ही न्याय देणार आहोत. मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यामुळे पुन्हा आंदोलनाची गरज नव्हती. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. यामुळे सुरु केले हे आंदोनल मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

हे ही वाचा

‘मराठा’ जातीसंदर्भात शंभर वर्षांपूर्वीची बातमी असणारे कात्रण व्हायरल, त्या बातमीत म्हटले…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.