Badlapur Ac Local : बदलापूरची एसी लोकल अखेर उद्यापासून रद्द, प्रवाशांच्या आक्रमक भूमिकेपुढे रेल्वे प्रशासन नरमलं!

मुंबई सीएसएमटीहून संध्याकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी लोकल सुटते. पूर्वी साधी असलेली ही लोकल गेल्या काही दिवसांपासून एसी करण्यात आली होती. मात्र एसी लोकलचं भाडं परवडण्यासारखं नसल्यानं संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी सुटणारी ही लोकल अक्षरशः रिकामी येत होती.

Badlapur Ac Local : बदलापूरची एसी लोकल अखेर उद्यापासून रद्द, प्रवाशांच्या आक्रमक भूमिकेपुढे रेल्वे प्रशासन नरमलं!
बदलापूरची एसी लोकल अखेर उद्यापासून रद्द
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 10:00 PM

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात आज सलग तिसऱ्या दिवशी रेल्वे प्रवाशांनी एसी लोकल (AC Local)विरोधात आंदोलन (Protest) करण्यात आलं. यानंतर अखेर बदलापूरकरांना नको असलेली एसी लोकल उद्यापासून बंद (Cancel) करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं जाहीर केला. मुंबई सीएसएमटीहून संध्याकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी लोकल सुटते. पूर्वी साधी असलेली ही लोकल गेल्या काही दिवसांपासून एसी करण्यात आली होती. मात्र एसी लोकलचं भाडं परवडण्यासारखं नसल्यानं संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी सुटणारी ही लोकल अक्षरशः रिकामी येत होती. तर या गर्दीचा सगळा भार मागून सुटणाऱ्या 5 वाजून 33 मिनिटांच्या खोपोली लोकलवर पडत होता. त्यामुळे एसी लोकल रद्द करून साधी लोकल चालवण्याची मागणी बदलापूरचे रेल्वे प्रवासी करत होते.

प्रवाशांची मागणी मान्य होत नसल्याने दोन दिवस सुरु होते आंदोलन

प्रवाशांची ही मागणी मान्य होत नसल्यानं मागील 2 दिवसांपासून स्टेशन मास्तरांना घेराव घालत प्रवासी एसी लोकल रद्द करण्याची मागणी करत होते. तरीही आज संध्याकाळी पुन्हा एकदा एसी लोकल सुटल्यानं प्रवाशांनी या एसी लोकलने विनातिकीट प्रवास केला आणि त्यानंतर बदलापूर स्थानकात स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर जमून एसी लोकल रद्द करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. प्रवाशांच्या या आक्रमक भूमिकेनंतर अखेर रेल्वे प्रशासनानं नमतं घेत एसी लोकल उद्यापासून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. तर बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांचा एसी लोकलला विरोध नसून साधी लोकल बंद करून त्याजागी एसी लोकल सुरू करायला विरोध आहे. एसी लोकलसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्याची प्रवाशांची मागणी आहे. आता संध्याकाळची एसी लोकल बंद करण्यात आली असली, तरी कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी लाईनच नसल्यानं एसी लोकलसाठी वेगळं वेळापत्रक तयार करणं शक्य होतं का, हे पाहावं लागेल. (Badlapur AC local is finally canceled from tomorrow after the protest of passenger)

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.