“अशी बातमी देतेय जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय”, बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाला विरोधकांनी धरलं धारेवर
Badlapur aadarsh school case : बदलापूरमधील घटनेने सगळीकडे संतापाचं वातावरण असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. वामन म्हात्रे यांच्यावर टीका होत आहे. याबाबत मात्र अजून त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
बदलापुरातील आदर्श विद्यालयातील दोन लहान मुलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराने संपूर्ण बदलापूर हादरलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे सगळीकडे तणावाचं वातावरण आहे. संतप्त नागरिकांचे रेल्वे रोको करत गेल्या ८ तासांपासून आंदोलन सुरु आहे. मंत्री गिरीष महाजन हे देखील सरकारच्या वतीने बदलापूर स्थानकावर चर्चेसाठी पोहोचले होते. पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आंदोलक गुन्हेगाराला फाशी देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. बदलापुरातील या घटनेचे पडसात दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. पण असं असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी ट्विट करत वामन म्हात्रे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “तू अशी बातमी देतय जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय” हे शब्द आहे बदलापूर माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे. माजी नगराध्यक्ष असलेले हे वामन म्हात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक असल्याची माहिती पुढे आली आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार
“तू अशी बातमी देतय जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय”
हे शब्द आहे बदलापूर माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे. माजी नगराध्यक्ष असलेले हे वामन म्हात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आणि कट्टर समर्थक असल्याची माहिती पुढे आली आहे.
पत्रकाराचे काम हे सत्य रिपोर्ट करणे.सकाळ… pic.twitter.com/ADqkfnNF14
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 20, 2024
बदलापूरच्या घटनेवर राज ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. गुन्हा दाखल करायला १२ तास का लागले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बदलापूरमध्ये झालेल्या या घटनेनं लोकांकडून गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी केली जात आहे.
बदलापूर घटनेप्रकरणी विशेष अधिवेशन बोलावण्याची इम्तियाज जलील यांनी मागणी केली आहे. विशेष अधिवेशन बोलवून कडक कायदा निर्माण करा. अन्यथा लोकं तुम्हाला कसे चिरडतात ते पहा अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.