युतीला बदनाम करण्यासाठी स्टंट, आरोपांवर काय म्हणाले बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे
बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही महिलेला कधीच उलट सुटल बोलत नाही. हा एक राजकीय स्टंट आहे. पोलीस योग्य तो तपास करतील. युतीला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
बदलापूरच्या घटनेनंतर प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकारासोबत अर्वाच्च भाषेत बोलण्याचा आरोप असलेल्या वामन म्हात्रे यांनी आरोपांवर उत्तर देताना म्हटले की, ‘सुषमा अंधारे पीडित मुलीच्या घरच्यांना न्याय देण्यासाठी आले असते आणि पोलिसांची चर्चा केली असती तर त्यांचा येणं हे स्वागतार्थ होतं. मात्र वामन म्हात्रे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी बदलापूरमध्ये येऊन आंदोलन करावे लागते ही माझ्यासाठी मोठी आनंददायी गोष्ट आहे. वामन म्हात्रे कधीही महिलांविषयी अपशब्द वापरत नाही. हा एक स्टंट आहे. याला राजकीय वळण देऊन मुख्यमंत्री आणि युतीचे सरकार बदनाम व्हावं यासाठी पत्रकार मोहिनी जाधव यांना हाताची घेऊन केलेला हा स्टंट आहे. मी मोहिनी जाधव यांना आव्हान केलेले की खरोखर आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे की वामन म्हात्रे यांनी अपशब्द तुला वापरलेत का. जातीवाचक शब्द वापरले आहे का?’
‘पोलीस यामध्ये तपास करतील अन त्याला मी सामोरे जाईल. मोहिनी जाधव हीच फेसबुक अकाउंट आणि ती ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणचे व्हिडिओ पहावे. तिची भाषा कशी आहे हे समजेल. लोकांना भडकवणारे बातम्या त्या ठिकाणी दिल्यात. पोलिसांना माझं आव्हान आहे त्या बातम्या तपासाव्या.’
‘मुलीला न्याय न देता हे आंदोलन वेगळा दिशेने चाललेले आहे. सुषमा अंधारे मुलीसाठी बसले असते ते जनतेने स्वागत केलं असतं. मात्र खोटं गुन्हा दाखल करण्यासाठी तीन तास बसायला लागले ही मोठी गोष्ट आहे. मी रात्री पोलिसांना सांगितलं तिची तक्रार घ्या माझी सुद्धा तिच्या विरोधात तक्रार आहे आणि तुम्ही तपास करा. यात काही खरं आणि खोटं असेल त्यासाठी आम्ही न्यायालयांमध्ये कायदेशीर जाण्यास तयार आहोत. ‘
‘मी मुख्यमंत्री यांचा एकदम जवळचा आहे त्यामुळे मला ते टार्गेट करतात. लाडकी बहीण योजना झपाट्याने वाढते. याचं पोटसुळ विरोधी पक्षातल्या लोकांमध्ये असेल. याचाच फायदा घेत वामन म्हात्रे आणि मोहिनी जाधव यांच्यातला वाद झालेल्या मध्ये एक दोन वाक्य जोडून याचं राजकीय भांडवल करता येईल आणि सरकारला बदनाम करता येईल याचा फायदा विरोधकांनी घेतलाय. मी जे बोललो ते कोणत्या कोपऱ्यात नाही बोललो. मी सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर बोललो आहे. यापैकी कोणीतरी येऊन बोलावं की वामन म्हात्रे यांनी असं काही म्हटले आहे का. मी गुन्हेगार असेल तर मला यात शिक्षा होईल.’
‘चेंबूर, पनवेल, कल्याण वेगवेगळे ठिकाणहून आलेले होते. ती लोकं कशासाठी आले आणि कोणी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि कुठल्या पक्षाचे लोक होते याची शहानिशा झाली पाहिजे. मोहिनी जाधव ही आमची फॅमिली मेंबर आहे. आज त्यांना वाटत असेल आम्ही स्टंटबाजी केली मात्र आम्ही एका गावात राहतो एका शहरात लहानाचे मोठे झालेलो आहे. निवडणुका झाल्यावर आम्ही सगळे एकत्र काम करतो.’
‘मोहिनी जाधव पंधरा दिवस एक महिन्यात माझ्याबरोबर दिसेल तेव्हा सुषमा अंधारे काय बोलतील हे पहा. पोलिसांनी मला नोटीस देऊ दे माझ्यावर पोलिसांनी दबावाने हा गुन्हा दाखल केलाय. मी कोणाची हत्या किंवा मारझोड केली नाही. ज्यामुळे पोलीस येतील आणि मला लगेच अटक करतील. या तपास करून खरं काय खोटं काय हे बघतील पोलीस आणि त्यानंतर मी त्यांना न्यायालयीन उत्तर देखील देईल.’