भाजपची कार्यपद्धती देशहिताची नाही, BJP सत्तेत न येणं ही काळाची गरज: Balasaheb Thorat
भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवारांच्या या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलं आहे. भाजपची कार्यपद्धती आणि तत्त्वज्ञान देशहिताचं नाही.
ठाणे: भाजपला (bjp) सत्तेत येऊ देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी म्हटलं आहे. पवारांच्या या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलं आहे. भाजपची कार्यपद्धती आणि तत्त्वज्ञान देशहिताचं नाही. त्यामुळे भाजप सत्तेवर न येणं हीच काळाची गरज आहे. माणसामाणसात भेद निर्माण करणं, विष कालवणं हे राज्यघटनेस मान्य नाही. म्हणून भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं असावं, असं बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी म्हटलं आहे. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण आहे. नंतर ती नसायला हवी. सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
बाळासाहे थोरात यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. तसेच गोवा तो बस झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीत देवेंद्रजी म्हणत होते मी पुन्हा येणार. ते पुन्हा येणार असे निवडणुकीत म्हणायचे तेव्हा मी त्यावेळी बोललो होतो की त्यांनी आरशासमोर उभ राहावं. त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल आणि आज विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना काम पाहावं लागतंय. भाजपचा पिंड हा खरा विरोधी पक्षा करताच बनलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये, असा टोला थोरात यांनी लगावला.
राजू शेट्टींशी चर्चा करण्याची तयारी
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. राजू शेट्टींची काही नाराजी असेल तर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. त्यांच म्हणणं त्यांनी मांडले तर जे शक्य आहे ते महाविकास आघाडी नक्की करेल. किमान समान कार्यक्रमावर सर्व एकत्र काम करत आहेत. पुन्हा काही म्हणणे असेल आणि ते योग्य असेल त्यावर विचार करू. कोणाचे काही प्रश्न असले ते ऐकून घेऊ आणि सोडवू, असंही त्यांनी सांगितलं.
यांचा कोणता तोटा होणार आहे?
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष पदावरून राजकारण सुरू आहे. विधानसभेला वर्षभरापासून अध्यक्ष नाही आणि तो होऊ नये म्हणून भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. उच्च न्यायालया नंतर सुप्रीम कोर्टात जात आहेत. विधानसभेला अध्यक्ष मिळाल्याने यांचा कोणता तोटा होणार आहे?. राजकारण कोणत्या थराचं करावं हे भाजपला कळत नाही हे दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
गेल्या दोन वर्षातील बॅकलॉग भरून काढा; Chhagan Bhujbal यांचं उद्योजकांना आवाहन
Nagpur | उन्हाळा आल्याने शितपेय विक्रेते सक्रिय, अन्न व्यवसायिकांनी कायद्याचा भंग केल्यास कडक कारवाई