बंजारा समाज 27 फेब्रुवारीला मुंबईत धडकणार, आझाद मैदानावर मोर्चा

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. त्या अहवालाच्याआधारे मुख्यमंत्री पुढची कारवाई करतील. | Haribhau Rathod

बंजारा समाज 27 फेब्रुवारीला मुंबईत धडकणार, आझाद मैदानावर मोर्चा
बंजारा समाजाकडून येत्या 27 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ राठोड यांनी दिली. भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' या कादंबरीवर बंदी घालावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 8:07 AM

नांदेड: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील, अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केली. ते गुरुवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Banjara community organize protest march on 27 february in Mumbai)

यावेळी त्यांना संजय राठोड यांच्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा हरिभाऊ राठोड यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. त्या अहवालाच्याआधारे मुख्यमंत्री पुढची कारवाई करतील. मंत्री संजय राठोड यांच्याबाबत जितकी माहिती माध्यमांना आहे तितकंच मलाही माहिती असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले.

बंजारा समाजाचा 27 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा

बंजारा समाजाकडून येत्या 27 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ राठोड यांनी दिली. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीवर बंदी घालावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘हिंदू’ या कादंबरीत बंजारा समाजाबाबत आक्षेपार्ह लिखाण आहे, त्यामुळे या कादंबरीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

संजय राठोडांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा पोहरादेवी दौरा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. संजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे नेते आणि धर्मगुरुंच्या साक्षीने आपली बाजू मांडणार, असे सांगितले जात होते. मात्र, आता हा दौरा लांबणीवर पडला आहे.

बहुजन समाजाच्या नेत्याला संपवण्याचे षडयंत्र; संजय राठोडांना गोवलं जातंय: बंजारा धर्मगुरु

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan) संजय राठोड यांना जाणुनबुजून गोवले जात आहे. या माध्यमातून बहुजन समाजातील आणखी एक नेतृत्त्व संपवण्याचा डाव असल्याचा आरोप बंजारा समाजाच्या धर्मगुरुंकडून करण्यात आला होता. वेळ पडल्यास संजय राठोड यांच्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशाराही बंजारा समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

Sanjay Rathod Resignation Live Updates: संजय राठोड यांचा राजीनामा निष्पक्ष चौकशीसाठी: सूत्रांची माहिती

पूजा अरुण राठोड कोण?, मेडिकल रिपोर्ट काय सांगतो?, नांदेडशी कनेक्शन काय?; वाचा सविस्तर रिपोर्ट!

(Banjara community organize protest march on 27 february in Mumbai)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.