उद्धव ठाकरे यांना बोचणारे बॅनर, एक विधानसभा…पाच लोक…कधीतरी…

शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी राजू शिंदे यांचे स्वागत करणारे बॅनर लावले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावले आहे. दोन गटाच्या दोन बॅनरमुळे संभाजीनगर शहरात बॅनरवार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे यांना बोचणारे बॅनर, एक विधानसभा...पाच लोक...कधीतरी...
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 2:13 PM

छत्रपती संभाजी नगरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी शिवसंकल्प मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे संभाजीनगरात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उबाठा शिवसेनेत प्रवेश करत आहे. या शिवसेना प्रवेशावरुन उबाठामध्येच नाराजी नाट्य सुरु झाले आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

राजू शिंदे यांनी मला पाडले, त्यांनीच संदीपान भुमरे यांना 25 हजार मते मिळवून दिली. त्यांनी उद्धव साहेबांवर अनेक वेळा टीका केली, आता त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय साहेबांनी घेतला, तर ठीक आहे, असे खैरे यांनी म्हटले. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरात रविवारी लागलेले बॅनरही चर्चेचे ठरत आहेत. उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करुन हे बॅनर्स लावण्यात आले आहे. त्या माध्यमातून राजू शिंदे यांना विधानसभेचे आश्वासन दिल्याचे स्पष्ट होत आहे. ‘एक विधानसभा पाच लोकांना शब्द कसा पाळणार उध्दवजी’, असे या बॅनरवर लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे बॅनर

कधी तरी शब्द पाळणार का उद्धवजी

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दिलेला शब्द पाळणार का उद्धवजी

एक विधानसभा पाच लोकांना शब्द कसा पाळणार उद्धवजी

हे वाक्य लिहिलेला बॅनर संभाजीनगराच चर्चेचा ठरत आहे. उद्धव ठाकरे यांना बोचणारे बॅनर अज्ञात व्यक्तीने लावले आहे. त्या बॅनरवर कोणाचे नाव नाही. भाजप नेते राजू शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे हे बॅनर झळकले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे बॅनर लावले आहे.

शिवसेना उबाठाकडून बॅनरबाजी

शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी राजू शिंदे यांचे स्वागत करणारे बॅनर लावले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावले आहे. दोन गटाच्या दोन बॅनरमुळे संभाजीनगर शहरात बॅनरवार सुरु असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली असताना राजकीय पक्षात आयाराम गयाराम सुरु झाले आहे. महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीत जाण्याकडे अनेकांचा कल आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.