कार्यकर्त्यांना विजयाची खात्री, निकालाआधीच उमेदवाराच्या विजयाचे बॅनर
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात निकाला आधीच चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत. पाषाण परिसरात विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांकडून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले. या निवडणुकीचा निकाल शनिवारी येणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांमध्ये कुठे किती मतदान झाले, आपणास किती मतदान पडले असणार याबाबत आराखडे बांधले जात आहे. परंतु या निकालापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराचा विजय झाला? या आशयाचे बॅनर लावले आहे. अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसरात नाही तर राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
काय आहे त्या बॅनरमध्ये
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मतदानाचा उच्चांक झाला. एकूण सरासरी 71.75 टक्के मतदान झाले. अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेश परिसरातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून संग्राम जगताप पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या समोर शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर निवडणूक रिंगणात आहे. परंतु जगताप यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयाची खात्री आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा अशाचे बॅनर लावण्यात आले आहे. संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी हे बॅनर लावले आहे. त्यामुळे सध्या याच बॅनरची चर्चा नगर शहरात सुरू आहे. कालच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले.
निकालाआधी कार्यकर्त्यांनी ठरवला विजय
विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 तारखेला येणार आहेत. मात्र निकालापूर्वीच शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. नगर शहरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभिषेक कळमकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून संग्राम जगताप यांच्यात सामना पाहिला मिळाला. मतदान पार पडल्यानंतर विविध चर्चांना सध्या उदयन आला आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.
पुण्यातही लागले बॅनर
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात निकाला आधीच चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर्स लागले आहेत. पाषाण परिसरात विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांकडून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.