वादा तोच दादा नवा, अजित पवार यांना डिवचणारे बारामतीमध्ये बॅनर्स… नवीन दादा कोण?

युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढविणार आहे, आशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासून सुरु आहे. त्यातच आता बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले. बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून अजित पवार यांना डिवचले आहे.

वादा तोच दादा नवा, अजित पवार यांना डिवचणारे बारामतीमध्ये बॅनर्स... नवीन दादा कोण?
बारामतील लावण्यात आलेले बॅनर्स
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 9:07 AM

बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा पराभव झाला. शरद पवार यांनी पुन्हा बाजी मारली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केला. अगदी बारामती विधानसभा मतदार संघातही सुप्रिया सुळे यांना जास्त मते मिळाली. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांची विधानसभेत कस लागणार आहे. त्याचवेळी शरद पवार गटाकडूनही विधानसभेची तयारी सुरु केली आहे. अजित दादांऐवजी नवीन दादा तयार केला गेला आहे. अजित पवार यांना डिवचणारे बॅनर्स त्यासाठी बारामतीमधील सुपामध्ये लावण्यात आले आहे. ‘वादा तोच दादा नवा’, असे बॅनर्स लावले आहे. त्यात बारामतीचा नवीन दादा युगेंद्र पवार यांना म्हटले गेले आहे. यामुळे विधानसभेत पुन्हा पवार गटात लढाई जुंपणार आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे.

सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनातून साधला निशाणा

सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बारामतीमधील सुपा येथे बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या बॅनर्सवर ‘वादा तोच दादा नवा’ असे लिहिले असून युगेंद्र पवार यांच्या फोटो लावला आहे. तसेच “हर वाल का पलटवार हुं मै, युही नही कहलाता शरद पवार हुं मै ” असे वाक्य लिहून सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. या बॅनर्सची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

युगेंद्र पवार यांची तयारी सुरु?

युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढविणार आहे, आशी चर्चा सुरू आहे. त्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा आतापासून सुरु आहे. त्यातच आता बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले. बॅनरवर लिहिलेल्या मजकुरावरून अजित पवार यांना डिवचले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहे.

हे सुद्धा वाचा

युगेंद्र पवार सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. रोहित पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार अजित पवार यांच्यावर हल्ला करण्याची संधी सोडत नाही. यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत काका-पुतण्याची लढत रंगणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.