Rain prediction : बाप्पा आपल्या घरी येणार चिंब भिजून की कोरडाच, पाहा काय आहे हवामानाचा अंदाज?
उद्यापासून सुरु होणारा पाऊस राज्यात गौरी-गणपतींच्या विसर्जनापर्यंत राहण्याची शक्यता आहे. पाच सप्टेंबरपर्यं राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस असेल अशी शक्यता साबळे यांनी वर्तवली आहे. संपूर्ण राज्यभर परतीचा मान्सून व्यवस्थित होईल, असेही त्यांनी सांगितलेले आहे. विशेषत: नाशिक ,सांगली ,बीड, उस्मानाबाद, लातूर, या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होईल.
पुणे – गणेशोत्सवाची (Ganeshotsav)सुरुवात उद्यापासून होते आहे. दोन वर्ष कोरोना काळात उत्सवावर असलेल्या निर्बंधामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करता आला नव्हता. त्यामुळे राज्यभरात हा उत्सव यावेळी दणक्यात साजरा होणार आहे. मात्र उद्यापासूनच राज्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाची (rain in state)शक्यता हवामान तज्ज्ञ (prediction)व्यक्त करीत आहेत. त्यामुळे उद्या सकाळी गणरायांचे आगमन घराघरांत किंवा सार्वजनिक मंडळांत पावसात होण्याची शक्यता आहे. पुण्याचे हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी ही माहिती दिली आहे. उद्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 मिमी पाऊस होण्याची शक्यता त्यांवनी वर्तवली आहे.
5 सप्टेंबरपर्यंत असेल पाऊस
उद्यापासून सुरु होणारा पाऊस राज्यात गौरी-गणपतींच्या विसर्जनापर्यंत राहण्याची शक्यता आहे. पाच सप्टेंबरपर्यं राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस असेल अशी शक्यता साबळे यांनी वर्तवली आहे. संपूर्ण राज्यभर परतीचा मान्सून व्यवस्थित होईल, असेही त्यांनी सांगितलेले आहे. विशेषत: नाशिक ,सांगली ,बीड, उस्मानाबाद, लातूर, या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होईल, अशी शक्यता रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. रब्बीच्या पेरण्या चांगल्या होतील अशी हवामान स्थिती सध्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
देशात यावर्षी डिसेंबरपर्यंत राहणार पाऊस
देशात यावर्षी डिसेंबर पर्यंत प्रत्येक महिन्यात पाऊस राहिल, अशी शक्यताही साबळेंनी वर्तवली आहे. देशात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. ढगफुटी आणि पूर परिस्थिती या शक्यता आता वारंवार वाढत जाणार असल्याचे भाकितही त्यांनी व्यक्त केले आहे. हाच हवामान बदल पाकिस्तान मध्ये देखील झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात यंदा चांगला पाऊस
यावर्षी गणरायाच्या कृपेने राज्यात सर्वच भागात चांगला पाऊस झालेला आहे. मराठवाडा, विदर्भासह सगळ्याच भागात चांगला पाऊस झाला तर आहेच, तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे ओला दुष्काळाच्या स्थितीचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागला आहे. मुंबई, पुण्यासह मुख्य शहरांच्या पिण्याचा प्रश्नही यावर्षी मार्गी लागलेला आहे.