बारामतीमधून रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार निवडणूक रिंगणात, पण हे पवार ते…
Baramati ok sabha election 2024: अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. पवार कुटुंबातील अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व जण शरद पवार यांच्या मागे आहेत. शरद पवार स्वत: बारामती मतदार संघावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. यामुळे बारामतीमधील ही लढत चांगलीच चुरशीची होणार आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार घराण्यातील दोघांमध्ये दुरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात ही लढत आहे. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. दोघांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात रिक्षावाला संघटनेकडून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. या उमेदवाराचे नाव शरद पवार आहे. पण हे शरद पवार म्हणजे “शरद राम पवार” आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद गोविंदराव पवार नाहीत. परंतु नावात साधर्म्य असल्यामुळे चर्चा रंगली आहे.
कोण आहेत शरद राम पवार
बारामती लोकसभा मतदार संघासाठी शरद राम पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून रिक्षावाला संघटनेने उमेदवारी दिली आहे. शरद पवार यांच्यासारखे नाव असल्याने राजकीय वर्तुळात शरद राम पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगील आहे. शरद राम पवार हे स्वतः रिक्षाचालक असून गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये वास्तव्यास आहेत.
सुनेत्रा पवार समाजकारणात तर सुप्रिया सुळे राजकारणात
बारामतीमधील अजित पवार गटातील उमेदवार सुनेत्रा पवार गेल्या 25 वर्षांपासून मी समाजकारणात कार्यरत आहेत. त्या बारामती टेक्सटाईल पार्कच्या चेअरमन आहेत. काटेवाडीत निर्मल ग्राम योजनेचे काम त्या करतात. त्यांची एक संस्था जनसंधारणाची काम करते. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे सलग १५ वर्षांपासून खासदार आहेत. २००९-२०१४, २०१४-२०१९, २०१९- २०२४ या काळात त्या खासदार राहिल्या आहेत.
अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. पवार कुटुंबातील अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व जण शरद पवार यांच्या मागे आहेत. शरद पवार स्वत: बारामती मतदार संघावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. यामुळे बारामतीमधील ही लढत चांगलीच चुरशीची होणार आहे.